चंद्रशेखर बोबडे

नागपूर: समृद्धी महामार्गाची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचे सारथ्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेच्या पोटातील पाणीही हलू दिले नाही. राज्यातील सरकाररुपी वाहनाचे सारथ्यही फडणवीस यांच्याचकडे आहे. मात्र पाच महिन्यांच्या या प्रवासात शिंदे यांच्या खुर्चीलाच हादरे बसू लागले की काय अशी शंका उत्पन्न करणारे चित्र विदर्भात तरी निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे. याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सबंध भारतीय जनता पक्षाशीच असल्याने त्याची राजकीय वर्तुुळात चांगलीच चर्चा आहे.

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

समृद्धी महामामार्गाच्या उद्घाटनापूर्वी ५ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयुक्त महामार्ग पाहणी झाला. यावेळी नागपूर-शिर्डी ५२० किलोमीटर प्रवासात शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द फडणवीस यांनी केली केले. ताशी १५० किलोमीटर या वेगात फडणवीस यांनी हे अंतर अत्यंत सुरक्षितरित्या पूर्ण केले. फडणवीस यांनी माझ्या पोटातील पाणी सुद्धा हलू दिले नाही इतके सुरक्षित वाहन चालवले,अशा शब्दात शिंदे यांनी त्यांचे कौतुकही जाहीर कार्यक्रमात केले.

हेही वाचा: जयसिंग गिरासे : समाजभान असलेला कार्यकर्ता

हा झाला रस्त्यावरचा वेगवान प्रवास. पण राजकारणातील वेग आणि प्रवास या दोन्हीही बाबी भिन्न असतात. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची गाडी सुसाट चालली असली तरी याही गाडीचे सारथ्य फडणवीसच करीत असून या पाच महिन्यात मात्र शिंदे यांना येत असलेला अनुभव भिन्न आहे. कारण या काळात त्यांच्या खुर्चीलाच हादरे देणाऱ्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांमागेचे तार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाशी येऊन मिळत आहेत. याबाबतचे अलीकडच्या काळातील काही घटना बोलक्या ठराव्या अशा स्वरुपाच्या आहेत. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात आले.

पंतप्रधानांचा दौरा जरी राज्यात असला तरी त्यावर मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांचीच छाप होती. शिंदे यांच्यासाठी विदर्भभूमीत हा पहिला धक्का होता. त्यानंतर शिंदे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले. त्याच्या दोन तास आधी खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे,अशी जाहीर इच्छा व्यक्त करून एक प्रकारे शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरच प्रश्न चिन्ह उभे केले. हा शिंदे यांच्यासाठी दुसरा धक्का होता. त्याच दिवशी सायंकाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनीच प्रमुख घोषणा करून शिंदे यांच्या उपस्थितीत ‘सुपर मुख्यमंत्री’ कोण हे अप्रत्यक्षरित्या दर्शवून दिले.

हेही वाचा: नगरमध्ये बाळासाहेब थोरात, रोहित पवार आदी प्रस्थापितांना धक्का

हा तिसरा धक्का होता. अधिवेशनात दुसऱ्या दिवशी एनआयटी भूखंड वाटपावरून झालेली राजीनाम्याची मागणी हा शिंदे यांच्यासाठी जबर धक्का ठरला. या मुद्यावर भाजपने दोन्ही सभागृहात शिंदे यांची आक्रमकपणे पाठराखण केली खरी पण त्यासाठी ज्या मुद्यांचा आधार घेण्यात आला (उद्या. न्यायप्रविष्ट बाबींवर सभागृहात चर्चा करता येत नाही, या नियमाचा आधार) त्यातून विरोधकांना नवे मुद्दे हाती लागले. त्यामुळे ते अधिक आक्रमक झाले. त्यामुळे भाजप शिंदे यांच्या पाठीशी आहे की ते दर्शवण्याचा देखावा करताना विरोधकांना बारुदगोळा पुरवित आहेत हेच शिंदे गटातील आमदारांना कळेनासे झाले आहे. अधिवेशनासाठी नागपुरात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी विदर्भाविषयी जिव्हाळा व्यक्त केला होता त्याच विदर्भाच्या राजधानीत (नागपूर) त्यांना एका पाठोपाठ राजकीय धक्के बसू लागले आहेत या मागे कोण आहे?या विषयी तर्क वितर्क लावले जात आहेत.