Gujarat election 2022 maldhari community decision to not vote to bjp in assembly poll spb 94 | Loksatta

मालधारी समाजाकडून भाजपाला मतदान न करण्याचा निर्धार, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाची चिंता वाढली?

मालधारी समाजाने भाजपाविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्याने भाजपाची चिंता वाढली आहे.

BJP flag
(संग्रहित छायाचित्र)

गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ सप्टेंबर अशा दोन टप्पात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानाला केवळ पाच दिवस बाकी आहेत, अशातच आता मालधारी समाजाने भाजपाविरोधात आंदोलनाचा पावित्रा घेतल्याने भाजपाची चिंता वाढली आहे. या आंदोलनाचा फटका भाजपाला निवडणुकीत बसू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – “नोटबंदी, जीएसटी धोरणे नाही, तर लहान व्यापाऱ्यांना…”, राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र

मागील दीड वर्षांपासून मालधारी समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे. या मागण्यांकडे भाजपाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत येत्या निवडणुकीत भाजपाला मतदान न करण्याचा निर्णय मालधारी समजाने घेतला आहे. ”सप्टेंबरमध्ये २०२० मध्ये मालधारी समाजाची एक महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आम्ही आमच्या मागण्या भाजपा सरकारसमोर ठेवल्या मात्र, भाजपाने जाणीवपूर्वक आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले”, असा आरोप मालधारी समाजाचे नेते नागजीभाई देसाई यांनी केला आहे.

हेही वाचा – Gujarat Election 2022 : निवडणुकीसाठी भाजपाची खास व्यूहरचना; ‘वॉर रूम’सह ५० हजार कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर प्रचार

“‘गुजरातमधील बर्दा आणि आलेच भागात राहणाऱ्या मालधारी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देणे, समाजातील अनेक नेत्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेणे, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह अनेक मागण्या आम्ही भाजपा सरकार समोर ठेवल्या होत्या. मात्र, सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 23:01 IST
Next Story
“नोटबंदी, जीएसटी धोरणे नाही, तर लहान व्यापाऱ्यांना…”, राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र