कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यांनी मी हिंदू आहे पण हिंदुत्त्वाचा विरोध करणारा आहे. मी आत्तापर्यंत कधीही श्रीरामाच्या मंदिराला विरोध केला नाही. मात्र हिंदुत्वाचा उपयोग राजकीय फायद्यासाठी करून घेण्याच्या मी विरोधात आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे सिद्धरामय्या यांनी?

मी कधी राम मंदिराला विरोध केला का? आमचा आक्षेप फक्त त्या गोष्टीचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करण्याला आहे. इतर धर्माच्या विरोधात हिंदुत्वाचा किंवा राम मंदिराचा उपयोग करण्यास आमचा विरोध आहे. भाजपाने राजकीय फायद्यासाठी हिंदुत्त्वाच्या मुद्द्याचा वापर करत आहे. मी हिंदू आहेच, मग हिंदूंचा विरोध कशाला करेन? पण हिंदुत्व आणि धर्म यांच्या आजूबाजूला जे राजकारण होतं आहे त्याचा मी कडाडून निषेध करतो. भारताच्या घटनेनुसार सगळे धर्म समान आहे. भाजपाने तुमच्यावर हिंदू विरोधी असण्याचा आरोप केला आहे त्याबाबत विचारलं असता सिद्धरामय्यांनी हे उत्तर दिलं आहे.

RSS ने कधीही भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही

जेव्हा सिद्धरामय्यांना स्वातंत्र्य आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काय भूमिका होती हे मल्लिकार्जुन खर्गेंनी म्हटल्यावरून प्रतिक्रिया विचारली तेव्हा सिद्धरामय्या म्हणाले की हिंदू महासभा असो किंवा RSS कुणीही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १९२५ मध्ये स्थापन झाला. केशव बळीराम हेडगेवार हे संघाचे संस्थापक होते त्यानंतर माधव सदाशिव गोळवलकर यांच्याकडे सरसंघचालक हे पद आलं. मला तुम्हीच सांगा ना यापैकी कुणी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता का? त्या काळात स्वातंत्र्यासाठीचा लढा परमोच्च शिखरावर होता. मात्र एकाही संघ स्वयंसेवकाने त्यामध्ये सहभाग घेतला नाही.

कर्नाटक भाजपाचे सरचिटणीस सी. टी. रवि यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा उल्लेख सिद्धरामय्या खान असा केला होता. त्याबाबत विचारलं असता सिद्धरामय्या म्हणाले की आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक संस्कृती आहे. या देशात प्रत्येकाला सोबत घेऊन वाटचाल करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे आधी माणूस म्हणूनच पाहिलं गेलं पाहिजे त्याला जाती किंवा धर्मात वाटलं जाणं चुकीचं आहे.मी हिंदू आहे. जेव्हा मी कर्नाटकचा मुख्यमंत्री होतो तेव्हा अनेक ग्रामीण भागांमध्ये रामाची मंदिरंही उभारली मात्र त्यावरून कधीही राजकारण केलं नाही असंही सिद्धरामय्यांनी म्हटलं आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am hindu but against hindutva said karnataka former cm siddaramaiah scj
First published on: 10-01-2023 at 19:16 IST