पालघर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराने पालघर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर २९ हजारांचे मताधिक्य घेतले. यामुळे पालघर विधानसभा मतदारसंघ महायुतीसाठी सुरक्षित मानला जात आहे. या दृष्टिकोनातून पालघर साठी भाजपाकडून राजेंद्र गावित यांच्यासाठी मागणी केली जाऊ लागल्याने विद्यामान आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

१९९० च्या दशकापासून पालघरच्या विधानसभा जागेवर शिवसेनेचे अधिकतर वेळा प्राबल्य राहिले आहे. २००९ मध्ये काँग्रेस तर्फे निवडून आलेले राजेंद्र गावित हे देखील २०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत महायुतीत सहभागी झाल्याने व २०१९ मध्ये शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवल्याने पालघर वर शिवसेनेचा दबदबा कायम राहिला आहे.

assembly elections 2024 the grand alliance dilemma over Chakan MIDC pune news
राज्यातील उद्योग पलायन ऐरणीवर! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चाकण एमआयडीसीवरून महायुतीची कोंडी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
possibility of a rift in the Mahavikas Aghadi over the Gondia Assembly Constituency
पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद अन् दोघेही बाशिंग बांधून तयार, पण सुमंगल कोणाचे? गोंदियावरून आघाडीत तिढा!
Mahayuti Social Outreach through various programs in Nashik print politics news
नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
vasai virar palghar, Hitendra Thakur, bahujan vikas aghadi
तिन्ही मतदारसंघ कायम राखण्याचे हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर आव्हान
Death of a T-9 tiger, ​​Navegaon-Nagzira Sanctuary, tiger,
गोंदिया : वर्चस्वाच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील घटना
cm eknath shinde led mahayuti alliance face reservation issue ahead of assembly elections
मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी सर्व समाजांना चुचकारताना मुख्यमंत्र्यांची कसोटी, निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

हेही वाचा : Vishwa Hindu Parishad : दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून धर्म संम्मेलनाचं आयोजन; भाजपाच्या मदतीसाठी संघ परिवार मैदानात?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लढणाऱ्या श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर ४० हजार पेक्षा अधिक मताने पराभव केला होता. शिवसेनेत फूट झाल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यांच्या कारकिर्दीत श्रीनिवास यांनी १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक विशेष निधी आणला तरीही त्यांचा प्रभाव मर्यादित राहिला आहे.

दरम्यान, लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर राजेंद्र गावित यांनी पालघर विधानसभा क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मिळालेले मताधिक्य व वैयक्तिक संपर्क आपल्या विजयासाठी पुरेसा असल्याने पालघरची जागा भाजपासाठी सोडावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यानच्या काळात श्रीनिवास वनगा यांनी पालघर विधानसभा क्षेत्र इतकेच लक्ष डहाणू विधानसभा क्षेत्राकडे देखील लक्ष देत असल्याने त्यांना डहाणू येथून उमेदवारी देण्याबाबत पक्षीय स्तरावर विचारविनिमय सुरू आहे.

माजी खासदार गावित यांना सामावून घाय्ण्यासाठी अदला बदल करण्याबाबत चाचपणी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून पक्षांतर करून उमेदवारीच्या हेतूने ठाकरे गटात दाखल झालेले डॉ. विश्वास वळवी यांच्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस वाढली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देखील या मतदारसंघात आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?

पालघर विधानसभा क्षेत्रात सुमारे एक तृतीयांश भाग हा डहाणू तालुक्यातील येत असल्याने मतदार संघातील वेगवेगळ्या पट्ट्यात विविध राजकीय पक्षांचे प्राबल्य असल्याने विधानसभेची लढत चुरशीची होण्याची अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून सद्यास्थितीत पालघर मधून किमान १२ उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, विद्यामान आमदारांना पालघरमधून पुन्हा संधी मिळणार का?याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

जनसंपर्क नसल्याचा आरोप

श्रीनिवास वनगा यांनी आपल्या कारकीर्दीत मतदारसंघात जनसंपर्क ठेवला नसल्याचा आरोप होत आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यास त्यांना फारसे यश मिळाले नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून अन्य उमेदवारांची देखील चाचपणी सुरू आहे.