राज्यातील नवीन मद्य धोरणावरून दिल्ली सरकारवर भाजपा आणि आम आदमी पक्षातला विखार धगधगतो आहे. त्यात पुन्हा अण्णा हजारे यांनी उडी घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप प्रमुख आणि आपले जुने सहकारी अरविंद केजरीवाल यांना टीकेचे लक्ष्य केले.  

केजरीवाल यांना संबोधून लिहिलेल्या पत्रात अण्णा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर “सत्तेची नशा” चढल्याचा आरोप करतात. हा माणूस “दिलेला शब्द राखणारा नाही” असेही नमूद करायला ते विसरत नाहीत. यावेळी २०१२ मध्ये लिहिलेल्या “स्वराज” पुस्तकातील परिच्छेदाचा दाखलाही ते देतात. राजकारणात सक्रीय होण्यापूर्वी मद्य विक्रीवरील भूमिकेची आठवण अण्णा यांनी केजरीवालांना करून दिली.

“एकेकाळी आपण आप प्रमुखांचा उल्लेख ‘गुरू’ म्हणून केला होता, “माझ्या आंदोलनात केजरीवालसारखा एकही माणूस नको” अशी आशा अण्णा व्यक्त करतात.केजरीवाल आणि माजी आयपीएस किरण बेदी हे अण्णांना शोधत महाराष्ट्राच्या राळेगणसिद्धी पोहोचले आणि   अण्णा भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा चेहरा बनले होते. एकेकाळी राजकारणाला चिखलाची उपमा देणाऱ्या केजरीवालांनी राजकारणापासून दूर राहण्याचे वचन पाळले नाही. सप्टेंबर २०१२ मध्ये दोघांत फूट पडली आणि त्यानंतर केजरीवालांनी आप’ची स्थापना केली.

अण्णा यांचे दीर्घकाळ पाठीराखे असलेले विश्वंभर चौधरी हे विरोधकांनी अण्णांना “भाजपा-आरएसएस” चा चेहरा संबोधल्याचे खंडन करतात. “खरं तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. अण्णांनी केजरीवाल यांच्यावर जी टीका केली त्याला कोणताही राजकीय आधार नाही.  उलट अशा वैयक्तिक शाब्दिक शेरेबाजीचा फायदा कायम आप’ला होतो. पंजाब विधानसभा निवडणुकीत ते दिसलेच आहे.” असेही चौधरी म्हणाले.

चौधरी सांगतात की, अण्णांनी केजरीवाल यांच्यावर मद्य धोरणावरून टीका केली. मात्र देशातील आणखी मोठे आणि गंभीर मुद्दे त्यांनी उचलून धरण्याची आवश्यकता आहे.अण्णा कायमच दारूबंदीसाठी आग्रही राहिले आहेत. दारूबंदीवरून चिघळलेल्या वादाचा उपयोग करून त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी राळेगणसिद्धीचा कायापालट करून ते हिरवेगार केले होते. अण्णांचा हा करिश्मा आहे.