BJP strategy for kumbh mela 2025 : तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. सोमवारपासून (१३ जानेवारी) सुरू झालेल्या या महाकुंभात आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे. पुढील ४५ दिवस हा धार्मिक कार्यक्रम चालणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार कुंभमेळ्यातून सामाजिक समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. २०२७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे.

कुंभमेळ्यातून भाजपाचा काय संदेश?

या निवडणुकीआधी अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय समुदायातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पक्षाने हा संदेश तयार केला आहे. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. विशेषत: निषादसारख्या सर्वात मागासलेल्या समुदायावर सरकारचं लक्ष आहे. काही दिवसांपासून राज्यातील भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर निषाद पार्टी आणि अपना दल (सोनी लाल) हे दोन्ही पक्ष नाराज असल्याचं दिसून येत आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाकडून खास संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

pune traffic route changes
किल्ले शिवनेरी येथे होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत बदल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
Union Budget has announced various incentive schemes for textile industry including Cotton Campaign
केंद्रीय अर्थसंकल्पाने वस्त्रोद्योगाचे धागे सुखावले, कापूस अभियानासह प्रोत्साहनपर विविध योजना
Police Officer mixes ash in food for devotees Viral Video
Maha Kumbh 2025 : पोलिसाने महाकुंभमेळ्यातील भाविकांसाठी शिजवल्या जाणाऱ्या अन्नात कालवली राख; Video Viral झाला अन्…
Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
tushar suryavanshi conversation with padamashri sabarmatee
आपल्याला काय हवे? सकस आहार, की दुर्धर आजार?

भाजपाने कुंभमेळ्यात कोणते बॅनर्स लावले?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्याला ‘सामाजिक समतेचा महान उत्सव’ असं म्हटलं आहे. या धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रयागराज आणि आजूबाजूच्या शहरांत भाजपाकडून अनेक बॅनर्सदेखील लावण्यात आले आहेत. त्यापैकी काही बॅनर्सवर प्रयागराजच्या श्रृंगवेरपूर येथे नुकत्याच उद्घाटन झालेल्या पार्कमधील निषाद राज यांच्या पुतळ्यासह प्रभू श्रीरामाच्या कांस्य पुतळ्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून ते २०१९ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या कुंभदरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुताना दिसून येत आहेत.

भाजपाकडून असा प्रयत्न का केला जात आहे?

एका भाजपा नेत्याने सांगितले की, “प्रयागराजमधील महाकुंभात स्नान करण्याठी सर्व जाती-धर्मातील लोक गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर एकत्र येत आहेत. सामाजिक समतेचं यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभाला सुरुवात होण्याआधी सर्व जाती समुदायातील लोकांना विभाजित न होता एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. आमच्या सरकारने श्रृंगवेरपूरमध्ये प्रभू श्रीराम आणि निषाद राजाचा भव्य पुतळा उभारून त्यांचा आदर आणि महत्व अधोरेखित केलं आहे”, असंही भाजपा नेत्यानं सांगितलं आहे.

दरम्यान, निषाद पक्षाचे प्रमुख संजय निषाद हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यांचा पक्ष निषाद समुदायावर आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला होता. समाजवादी पक्षाच्या ३७ जागांच्या तुलनेत भाजपाला केवळ ३३ जागांवरच विजय मिळवता आला. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील विरोधी पक्षाकडे दलित आणि ओबीसी मतदारांचा मोठा पाठिंबा होता, त्यामुळे भाजपाला अयोध्यासह इतर लोकसभा मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलं.

अयोध्येतील पोटनिवडणुकीची समीकरणं बदलणार?

येत्या ५ फेब्रुवारीला अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर दलित, ओबीसी आणि निषाद समुदायातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे पक्षाचे प्रयत्न आहेत, असं भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितलं आहे. मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात दलित, ब्राह्मण आणि निषाद समुदायातील सर्वाधिक मतदार आहेत.

दरम्यान, कुंभमेळ्याला सुरुवात झाल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “मकर संक्रांतीच्या निमित्ताने अमृत स्नानाच्या पहिल्या दिवशी सुमारे तीन कोटी ५० लाख भाविकांनी संगमात स्नान केले. हा कुंभमेळा श्रद्धा, समता आणि एकतेचा महान मेळावा आहे”, असं ते म्हणाले. २०१९ च्या कुंभमध्ये केलेल्या प्रयोगाला पुढे नेत योगी सरकारने महाकुंभमध्ये काम करणाऱ्या १५ हजारांहून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी भाषणात काय म्हणाले होते?

गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी महाकुंभाशी संबंधित विविध प्रकल्पांचा शुभारंभ करण्यासाठी प्रयागराजला भेट दिली होती, त्यावेळी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला ‘एकतेचा महायज्ञ’ असं म्हटलं होतं. प्रयागराज ही निषाद राजाची भूमी आहे, असा उल्लेखही मोदींनी आपल्या भाषणात केला होता. निषाद राज पार्कचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी प्रभू श्रीराम आणि निषाद राज यांच्या मैत्रीबद्दल उपस्थितांना सांगितलं होतं. त्यांचा नवा पुतळा भावी पिढ्यांसाठी समानता आणि एकोप्याची आठवण करून देईल, असंही मोदी म्हणाले होते.

२०२७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्वच्छता कर्मचाऱ्यांचं कौतुकही केलं होतं आणि २०१९ च्या कुंभमेळ्यात त्यांचे पाय धुवून त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या कृतज्ञेची आठवण करून दिली. “स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुताना मला मिळालेले समाधान हा माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय आणि अविस्मरणीय क्षण होता”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभात सर्व जाती-धर्मातील लोकांना दिलेला एकोप्याचा संदेश २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी नवसंजीवनी ठरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader