जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ग्रामस्वच्छता मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे या दोन प्रतिस्पर्ध्यांचे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीआधीच खडाजंगी सुरु झाली आहे. या मतदारसंघात त्यांच्या पक्षाचे जे कोणी उमेदवार असतील, त्यापेक्षा या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळेच दोघांकडून एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी म्हणजे २००९ पूर्वी तत्कालीन जळगाव, तर आताचा रावेर आणि तत्कालीन एरंडोल, तर आताच्या जळगाव लोकसभा मतदारसंघांत भाजपचे वर्चस्व होते. पुनर्रचनेनंतर, म्हणजे २००९ नंतरही रावेर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा हा गड भेदण्यासाठी महाविकास आघाडीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. २००९ मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर आणि तालुका हा जुन्या एरंडोल मतदारसंघाशी जोडला गेल्यामुळे नवीन रावेर लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांची खानदेशात पक्षावर मजबूत पकड होती. त्यामुळे भाजपने २०१४ मध्ये दिवंगत खासदार हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी न देता खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना लेवा आणि गुर्जर समाजाची साथ मिळाल्यामुळे मोठ्या मताधिक्क्याने त्या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे २०१९ मध्येही पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला, दुसऱ्यांदा रक्षा खडसे या मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या. राष्ट्रवादीने २००९ मध्ये रवींद्र पाटील आणि २०१४ मध्ये माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे पुत्र मनीष जैन यांना रिंगणात उतरवून पाहिले. परंतु, दोघांचा भाजपपुढे निभाव लागला नाही. काँग्रेसकडून २०१९ मध्ये डॉ. उल्हास पाटील उमेदवार होते.

BJP state president, chandrashekhar bawankule, Criticizes sharad pawar NCP s Manifesto, Deceptive manifesto, bjp, sharad pawar ncp, lok sabha 2024, election 2024, election campaign, criticise, marathi news,
“शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शपथनामा’ ही जनतेची फसवणूक,” भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका, म्हणाले…
bjp leader sanjay kshirsagar to join sharad pawar ncp
मोहोळमध्ये भाजपचे असंतुष्ट नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटात, शरद पवारांच्या उपस्थितीत  होणार पक्षप्रवेश
Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल
Manoj Jarange Patil reacts on who will get support by maratha community in Lok Sabha elections
लोकसभा निवडणुकीबाबत मराठा समाज कोणाच्या बाजूने? मनोज जरांगे पाटील म्हणाले, “उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे व्हा…”

हेही वाचा : लिव्ह इन रिलेशनशिप ते बहुपत्नीत्व; उत्तराखंडमधील समान नागरी कायद्यात नेमक्या तरतुदी काय?

समीकरणे बदलली

राज्यासह जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यात खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले. शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीचे दोन भाग झाले. सध्या या मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे खासदार आहेत. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत गेले असले तरी, रक्षा खडसे या भाजपमध्येच असून पक्ष पुन्हा संधी देईल अशी त्यांना अपेक्षा आहे. दिवंगत खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांचे नावही भाजपकडून चर्चेत आले आहे. ते सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. या मतदारसंघावर महायुतीतील अजित पवार गटानेही दावा केला असला तरी भाजपकडून त्यांच्यासाठी मतदारसंघ सोडला जाण्याची शक्यता कमीच आहे. अजित पवार गटाकडून माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे पुत्र मनीष इच्छुक आहेत. या मतदारसंघात काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते डाॅ. उल्हास पाटील, त्यांची मुलगी केतकी पाटील हे इच्छुक होते. परंतु, महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला हा मतदारसंघ येणे शक्य नसल्याचे दिसताच दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आधीच कमकुवत असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला. मंत्री गिरीश महाजन यांची ही खेळी असल्याचे मानले जात आहे. महाजन यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघातील स्वत:चा मार्ग अधिक निर्धाेक करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. गरुड यांनी महाजन यांच्याविरोधात तीनवेळा निवडणूक लढवली होती. गरुड भाजपमध्ये आल्याचा रावेर लोकसभा मतदारसंघातही फायदा व्हावा, हे गणित यामागे आहे.

शरद पवार गट आग्रही

रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गट अधिक आग्रही आहे. पवार गटाकडून एकनाथ खडसे यांनी उमेदवारी मिळाल्यास आपण तयार असल्याचे याआधीच जाहीर केले आहे. रवींद्र पाटील यांचेही नाव उमेदवार म्हणून घेतले जात आहे. गिरीश महाजन यांनी खडसे यांना निवडणूक लढविण्याचे आव्हान दिलय. भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यास आणि शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे रिंगणात उतरल्यास सासरे विरुध्द सून अशी लढत रंगू शकते. मतदारसंघात कपाशीला मिळणारा अत्यल्प भाव, केळी पीक विम्याची रक्कम न मिळणे या दोन समस्यांमुळे शेतकरीवर्ग सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे. कोळी समाजाकडून अनेक दिवस अन्नत्याग सत्याग्रह करुनही त्यांच्याकडे सत्ताधारी मंत्री न फिरकल्याने त्यांच्यातही असंतोष दिसतो. यामुळे भाजपपुढे आव्हान आहे.

हेही वाचा : ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांची ‘नवीन’ खेळी; ISBT ला देणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव

महायुतीचे प्राबल्य

रावेर लोकसभा मतदारसंघात जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर-यावल, चोपडा आणि विदर्भातील मलकापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. रावेर-यावल मतदारसंघातील काँग्रेसचा आमदार वगळता, जामनेर, भुसावळमध्ये भाजप, तर मुक्ताईनगर, चोपडा येथे शिंदे गटाचेे आमदार आहेत.

२०१९ निवडणुकीत प्रमुख उमेदवाराची मते

रक्षा खडसे (भाजप) – ६, ५५, ३८६
डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस) – ३, १९, ५०४