सुहास सरदेशमुख

औरंगाबाद: शिवसेनेतील फुटीनंतर कार्यकर्ते बांधून ठेवण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागत असतानाच भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली आहे. राज्यातील सत्ताबदल हा २०२४ मधील लोकसभेच्या तयारीचाच भाग मानला जात असून प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा आणि बांधणीची पूर्वतयारी जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रोजगार मंत्री भूपेंद्र यादव २१ व २३ ऑगस्ट दरम्यान येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचाही ते दौरा करणार आहेत.केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कोणत्या घटकांची चर्चा करायची, त्याचे स्वरुप काय असावे यासाठी १३ ऑगस्ट रोजी चंद्रशेखर बावनकुळेही औंरगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. या मतदारसंघातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा चेहरा पुढे करण्यात आला आहे.

hatkanangale lok sabha constituency marathi news,
मतदारसंघाचा आढावा : हातकणंगले; पंचरंगी लढतीत कमालीची चुरस
Loksatta chavdi happening in Maharashtra politic news on Maharashtra politics
चावडी: पंकजाताईंचे राजकीय वजन एवढे वाढले?
Loksabha Election 2024 Goa Congress Viriato Fernandes BJP Constitution Narendra Modi
गोव्यावर भारताचं संविधान लादण्यात आलं? काँग्रेस उमेदवाराच्या वक्तव्यावरून वादाला फुटलं तोंड
Loksabha Election 2024 Kerala Congress Left fight in Kerala BJP
“तुमच्या आजीनेच आम्हाला तुरुंगात टाकलं”; डाव्यांची राहुल गांधींवर टीका

केंद्रीय वित्त राज्यमंत्री म्हणून काम करताना डॉ. कराड यांनी विधानसभा मतदारसंघातील संपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यात आपणच पुढाकार घेत असल्याचेही चित्र उभे रहावे असेही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. विमानतळ विस्तारीकरण तसेच औरंगाबाद शहरात येणाऱ्या विमानांची संख्या वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे तसेच पर्यटनाच्या क्षेत्रातही बदल घडविण्यासाठी ते बैठका घेत आहेत. प्रशासकीय पातळीवर डॉ. कराड हेच भाजपाचा लोकसभेचा चेहरा असतील अशी रणनीती आखली जात आहे.

हेही वाचा… नागपूर शहर काँग्रेसचा वाद थेट दिल्ली दरबारी, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा गटबाजीला ऊत

हेही वाचा… Maharashtra News Live : टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल, सर्व घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविण्याचा निर्णय झाला आहे. कराड व बावनकुळे या दोघांचीही ओबीसी नेते अशी ओळख आहे. औरंगाबाद लाेकसभा मतदारसंघाचा पूर्वेतिहास लक्षात घेता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे वर्चस्व होते. मराठा व मराठेतर या अंतर्गत वादातून तसेच हिंदू- मुस्लिम अशा दुहेरी संघर्षातून त्यांचा पराभव झाला. त्यामुळे ओबीसीची बांधणी अशी भाजपची रणनीती असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत संघर्ष काळात उभे राहिले आहेत. त्यामुळे तेही या जागेवर दावा करत असतानाच लोकसभा लढविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांची इच्छाही लपून राहिलेली नव्हती. मात्र, जिल्ह्यातील पाच आमदार फुटल्याने सेनेमध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील उणिवांवर शिंदेगटातून बोट ठेवले जात असताना भाजपने लोकसभेच्या तयारीला सुरूवात केली आहे. या तयारीत शेतकरी, डॉक्टर, विधिज्ञ तसेच विविध व्यवसायातील व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. केंद्रीय मंत्री विधानसभा क्षेत्रात वेळ देणार असून भाजपच्या विविध संघटनांची बांधणी केली जाणार आहे.

तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एक बैठक नुकतीच घेण्यात आली आहे. त्यात केंद्रीय मंत्री आढावा घेणार असल्याचे ठरविण्यात आले. लोकसभा निवडणुकीसाठी आता भाजपने तयारी सुरू केली आहे. – प्रशांत बंब, प्रभारी लोकसभा औरंगाबाद