“केजरीवालांच्या हत्येचा भाजपाचा कट”, मनीष सिसोदियांचा गंभीर आरोपावर मनोज तिवारींकडून प्रत्युत्तर, म्हणाले...| Manoj Tiwari responded to Manish Sisodians serious allegation that there is a BJP conspiracy to kill Kejriwal msr 87 | Loksatta

“केजरीवालांच्या हत्येचा भाजपाचा कट”, मनीष सिसोदियांच्या गंभीर आरोपावर मनोज तिवारींनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

…. त्यामुळे त्या दोघांचे आपसात काय सुरू आहे, हे आम्हाला समजण्यापलीकडे आहे, असंही तिवारींनी म्हटलं आहे.

“केजरीवालांच्या हत्येचा भाजपाचा कट”, मनीष सिसोदियांच्या गंभीर आरोपावर मनोज तिवारींनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…
(संग्रहित)

दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक आणि दिल्ली महापालिका निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात आहे, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. दिल्लीतील भाजपा खासदार मनोज तिवारी या कटात सामील असल्याचंही ते म्हणाले आहेत. सिसोदियांच्या या गंभीर आरोपांना मनोज तिवारींनी पत्रकारपरिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.

मनीष सिसोदियांच्या आरोपांनंतर मनोज तिवारींनी पत्रकारपरिषद घेत म्हटले की, “मी काल अरविंद केजरीवालांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. मला तर वाटतं की ते सुरक्षित रहावेत. ज्याप्रकारे त्यांचे आमदार मार खात आहेत. ज्याप्रकारे त्यांच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. ही सर्व परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. आमचं ट्वीट वाचा आम्ही काय लिहिलं आहे. ही जी हत्या आणि हत्येच्या धमकीची स्क्रीप्ट आहे, ही आम आदमी पार्टीची फार जुनी स्क्रीप्ट आहे.”

हेही वाचा – Bhima Koregaon : आनंद तेलतुंबडेंना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने NIA ची याचिका फेटाळली!

याचबरोबर तिवारींनी पत्रकारपरिषदेत मनीष सिसोदियांच्या ट्वीटची प्रत दाखवत सांगितले की, “भाजपा केजरीवालची हत्या घडवू इच्छिते असे यामध्ये आहे आणि हे २०१९ चे ट्वीट आहे. म्हणजेच हा आरोप दरवर्षी केला जातो, केवळ वर्ष बदलतं मात्र यांचा आरोप तोच राहतो. ”
याशिवाय “आम्हाला सजमत नाही की अरविंद केजरीवाल वारंवार मनीष सिसोदीयांना तुरुंगात टाकण्याचं बोलत राहतात आणि मनीष सिसोदीया केजरीवालांच्या हत्येची भविष्यवाणी करत आहेत. त्या दोघांचे आपसात काय सुरू आहे, हे आम्हाला समजण्यापलीकडे आहे.” असंही मनोज तिवारींनी यावेळी बोलून दाखवलं.

मनीष सिसोदिया काय म्हणाले? –

मनीष सिसोदिया यांनी पत्रकारपरिषद घेत सांगितले की, “मनोज तिवारींनी केजरीवाल यांना धमकी दिली आहे. या धमकीमुळे स्पष्ट झाले आहे की, “भाजपा अरविंद केजरीवालांची हत्या करण्याचा कट रचत आहे. षडयंत्रात अडकवण्याच्या कटात भाजपा यशस्वी होऊ शकली नाही, यामुळे आता असा कट रचत आहे. मनोज तिवारींना कसं माहिती की केजरीवालांवर हल्ला होऊ शकतो? या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करू आणि मागणी करू की हत्येची धमकी देण्यासाठी मनोज तिवारींना अटक केली जावी.”

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 19:50 IST
Next Story
UP Bypoll: खटौली मतदारसंघात भाजपाची वाट बिकट, मुझफ्फरनगर दंगल पीडिताची आई निवडणुकीच्या रिंगणात