मीरा-भाईंदर : गेल्या काही दिवसांपासून मिरा भाईंदरमधील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यातील वाद प्रचंड टोकाला पोहोचले आहेत. सरनाईक यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता तसेच भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेच्या कंटेनर शाखा तोडण्यात आल्या. त्यामुळे आता संतप्त झालेल्या शिवसेनेने तर नरेंद्र मेहता यांना प्रचारापासून दूर ठेवा, असे पत्रच महायुतीच्या नेत्यांना दिले आहे.

मीरा भाईंदर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. सतत शहरात येऊन पक्षाची घडी बसविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर या शहरात आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वादाला तोंड फुटले आहे. निमित्त झाले ते माजी भाजप नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्यावर झालेल्या कारवाईने. प्रताप सरनाईक आणि हॉटेल व्यावसायिक असलेल्या अरविंद शेट्टी यांच्यात व्यावसायिक वाद होता. त्यामुळे सरनाईक यांनी एमएमआरडीएला हाताशी धरून शेट्टीविरोधात गुन्हा दाखल केला. या सर्वांमागे आमदार प्रताप सरनाईक असल्याचा आरोप शेट्टी यांनी जाहीरपणे केला. एवढ्यावर ते थांबले नाही, फेसबुक लाईव्ह करून प्रताप सरनाईकांवर बेछूट आरोप केलेत. प्रताप सरनाईक यांचे राजकीय शत्रू असलेले भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता ही संधी कशी सोडतील? त्यांनी या वादात उडी घेतली. राजकीय दबावपोटी शेट्टींवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आरोप त्यांनी केला आणि या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. उघडपणे प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या आंदोलनाचा सर्व रोख हा सरनाईक यांच्या विरोधात होता. अखेर नरेंद्र मेहता यांनी वरून आणलेला दबाव आणि आंदोनल यामुळे शेट्टी यांच्या तक्रारीवरून काशिमिरा पोलिसांनी एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांवरदेखील गुन्हा दाखल केला होता. माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी अशा प्रकारे प्रताप सरनाईक यांना शह दिला.

different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला

दोन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष एकमेकांविरोधात

प्रताप सरनाईंकांविरोधात भाजपाच्या नरेंद्र मेहता यांनी खेळी केल्याने शिंदे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांनी काशिमिरा पोलीस ठाण्यात पत्र देऊन अरविंद शेट्टीच्या अटकेची मागणी केली आणि अटक न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. ते पाहून राजू भोईर यांच्या विरोधात भाजपनेदेखील आक्रमक पाऊल उचलेले आहे. राजू भोईर यांचे २०१० सालचे जुने अनधिकृत बांधकामे प्रकरण काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाने केली आहे. भोईर यांना अटक करावी, अन्यथा भाजप पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यात मोर्चा घेऊन येणार असल्याचा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी दिला. प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता एकमेकांविरोधात शह-काटशहाचे राजकरण करू लागल्यानंतर दोन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष एकमेकांविरोधात भिडले.

हेही वाचा – चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उघड तर भाजपमध्ये छुपी गटबाजी

शिवसेनेच्या कंटेनर शाखांवर कारवाई

भाजप आणि शिवसेनेमधील या वादाने राजकीय वातावरण पेटले. भाजपदेखील आक्रमक झाला. शिवसेनेने (शिंदे गटाने) शहरात कंटेनर शाखा उघडल्या आहेत. त्या बेकायदेशीर असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव वाढवला आणि त्या शाखांवर पालिकेने कारवाई केली. यामुळे शिवसैनिक चवताळले आहेत. या प्रकारामुळे पूर्वीच्या एकसंघ शिवसेनेतील शिवसैनिकांचा नरेंद्र मेहतांवर राग उफाळून आला आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नरेंद्र मेहता यांना निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांचे थेट नाव घेतले नसले तरी कलंकित नेता असा उल्लेख या पत्रात केला आहे. अन्यथा प्रचार करणार नाही, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा – शहांनी बडदास्त ठेवलेले उदयनराजे आता भेटीसाठीही तरसले!

मी करत असलेल्या विकास कामांमुळे काहींनी हे विरोधाचे राजकारण केले आहे. मला भाजपाचा विरोध नाही तर एका विशिष्ट व्यक्तीचा विरोध आहे, अशा शब्दात प्रताप सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांचे नाव न घेता टीका केली. ‘हाती चले अपनी चाल, कुत्ते भौके हजार’ असेही त्यांनी सुनावले. मात्र शिवसेना भाजप एकत्र असून त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.