देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपा २०२४ साली बहुमताने निवडून येणार असल्याचा दावा करत आहे. तर, काँग्रेस भारत ‘जोडो यात्रे’च्या माध्यमातून आपला जनाधार परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर, अनेक विरोधी पक्ष तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. अशात ‘इंडिया टुडे’चा एक सर्व्हे समोर आला आहे.

‘इंडिया टुडे’ने ‘सी-वोटर’बरोबर ‘मूड ऑफ द नेशन’ हा सर्व्हे केला आहे. त्यामध्ये देशातील १ लाख ४१ हजार लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्व्हेत ज्वलंत प्रश्नावर लोकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. आताच्या परिस्थितीत लोकसभा निवडणुका झाल्यातर तर कोणाला कोणाचं सरकार बनणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? यावर लोकांनी मतं दिली आहेत. तर सर्व्हेतून केंद्रात परत एकदा भाजपाची सत्ता येणार असल्याचं समोर येत आहे. तर, काँग्रेसला १०० जागाही मिळणं कठीण दिसत आहे.

हेही वाचा : राजस्थाननंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची अशी ही मतपेरणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता निवडणूक झाली तर कोणाला मिळणार किती जागा? ( एकूण ५४३ जागा )

  • राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए ) – २९८
  • संयुक्त पुरोगामी आघाडी ( युपीए ) – १५३
  • अन्य – ९२

कोणत्या आघाडीला मिळणार किती टक्के मतं?

  • एनडीए – ४३ टक्के
  • युपीए – ३० टक्के
  • अन्य – २७ टक्के

आता निवडणूक झाल्यातर कोणत्या पक्षाला मिळणार किती टक्के मतं?

  • भाजपा – ३९ टक्के
  • काँग्रेस – २२ टक्के
  • अन्य – ३९ टक्के

एनडीएच्या कोणत्या राज्यात जागा वाढणार?

  • आसाम – १२ जागा ( २०१९ मध्ये ९ जागा )
  • तेलंगाणा – ६ जागा ( २०१९ मध्ये ४ जागा )
  • पश्चिम बंगाल – २० जागा ( २०१९ मध्ये १८ जागा )
  • उत्तरप्रदेश – ७० जागा ( २०१९ मध्ये ६४ जागा )

हेही वाचा : काँग्रेसच्या ताब्यातील गुजरातमधलं डेअरीविश्व भाजपाने आपल्या अधिपत्याखाली कसं आणलं?

यूपीएच्या कोणत्या राज्यात जागा वाढणार?

  • कर्नाटक – १७ जागा ( २०१९ मध्ये २ जागा )
  • महाराष्ट्र – २३ जागा ( २०१९ मध्ये ६ जागा )
  • बिहार – २५ जागा ( २०१९ मध्ये फक्त १ )