नागपूर : २०२३ मध्ये नागपुरात आलेला महापूर आणि त्यामुळे झालेल्या वित्तहानीचा फटका भाजपला २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फटका बसला. आता महापालिका निवडणुका निवडणुका तोंडावर आहेत. आणि पुन्हा एकदा शहर पावसात बुडाले. नागपूरकरांची प्रचंड गैरसोय झाली. त्याचा संताप त्यांच्या मनात आहे, याचाही फटका महापालिकानिवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता आहे. एकूणच नागपूरचा पूर भाजप पाठ सोडत नसल्याचेच चित्र सध्या तरी आहे.

२०१४ नंतर नागपूरचा नावलौकिक देशात वाढला. याचे कारण नागपूरकर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले, येथील खासदार नितीन गडकरी केंद्रात मंत्री झाले. त्यामुळे सहाजिकच या शहराची चर्चा सर्वत्र झाली. गडकरींनी सिमेटच्या रस्त्यांचा धडाका लावला, त्याचा प्रचार आणि प्रसारही अधिक झाला, अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या शैक्षणिक संस्थांचे जाळे शहरात विणले गेले. औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीच्या घोषणा, करार जाले. प्रत्यक्षात गुंतवणूक आली नाही हा भाग वेगळा, मात्र चर्चा आणि गवगवा खुप झाला. सांगण्याचे कारण एकच की यामुळे नागपूर देशभर प्रसिद्धीला आले. प्रत्यक्षात या शहराची वाटचाल बकालतेकडे सुरू होती. सिमेटच्या रस्त्यामुळे नाल्या नष्ट झाल्या होत्या. नालेसफाईच्या नावाने बोंम्ब होती. या सर्वांची पोल सप्टेबर २०२३ मध्ये आलेल्या महापुरामुळे खुलली. केवल रात्रभर आलेल्या पावसामुळे संपूर्ण शहर पाण्यात बुडाले.

लोकांना बोटींव्दारे सुरक्षितस्थळी हलवावे लागले यातूनच या पुराच्या तीव्रतेची कल्पना यावी. नावात नदी असले तरी प्रत्यक्षात नालाच असलेल्या नागनदीच्या पुरामुळे शहरावर आपत्ती कोसळली होती. लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याची भरपाई शेकडोत देण्यात आली. काहींना मिळाली, काहींना ती मिळाली नाही, याचा संताप लोकांनी २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपवर व्यक्त केला. गडकरी येथून विजयी झाले. पण त्यांचे मताधिक्य कमालीचे घटले. खुद्द भाजपच्या म्हणवल्या जाणाऱ्या मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही भाजप उत्तम कामगिरी करू शकला नाही.फक्त जागा राखल्या खुद्द देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मताधिक्य घटले यावरूनच लोकांची भाजपविषयची नाराजी दिसून येते.

आता महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. पक्षाने नेहमीप्रमाणे तयारी सुरू केली. विविध विकासकामांच्या उद्घाटनाला जोर आला. रोज नवनव्या घोषणा होऊ लागल्या.महापालिकेवर प्रशासक असला तरी तेथील कामकाजाची सुत्रे भाजप नेत्यांच्या सूचनेवरूनच हलवली जात आहे. जनता दरबाराची संख्या वाढली आहे. नेत्यांची जनसंपर्क कार्यालये सुरू झाली आहे. एकूणच जनमानसात पक्षा विषयीची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच पुन्हा पावसामुळे नागपूर पाण्याखाली आले.

दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे शहरातील पन्नासाहून अधिक वस्त्या पाण्यात बुडाल्या. प्रमुख रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतके पाणी साचले होते की ,तेथील वाहतूकच बंद करावी लागली.. पोलीस ठाण्यात, रेल्वे स्थानकात मेट्रो स्थानक परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी, अशी स्थिती नागपुरात होती. यावरूनच महापालिकेने केलेली पावसाळापूर्व तयारी किती तकलादू होती, हे यातून दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. अंतर्गत रस्ते चिखलाने माखले. स्वच्छतेच्या नावावर बोम्ब आहे. एक लाख कोटी रुपयांची विकासाची कामे केल्याचादावा ,भाजप नेत्यांकडून केला जातो, तो किती पोकळ आहे हे पावसोच दाखवून दिले. याचा तीव्र संताप नागपूरकर जनतेच्या मनात आहे. त्याचे पडसाद महापालिकेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच नागपरमध्ये पूर भाजपच्या पाचवीला पुजला की काय असे चित्र आहे.