विधानसभा निवडणूक : नरेंद्र मोदी म्हणाले 'हिमाचल प्रदेश माझे दुसरे घर,' भाजपाच्या प्रचाराला सुरुवात | narendra modi starts himachal pradesh assembly bjp election campaign | Loksatta

विधानसभा निवडणूक : भाजपाच्या प्रचाराला सुरुवात, नरेंद्र मोदी म्हणाले ‘हिमाचल प्रदेश माझे दुसरे घर’

हिमाचाल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपाने येथे प्रचाराला सुरुवात केली आहे.

विधानसभा निवडणूक : भाजपाच्या प्रचाराला सुरुवात, नरेंद्र मोदी म्हणाले ‘हिमाचल प्रदेश माझे दुसरे घर’
नरेंद्र मोदी (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

हिमाचाल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपाने येथे प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील मंडी भागातील पड्डल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या युवा विजय संकल्प रॅलीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी मोदी यांनी हिमाचल प्रदेशला ‘दुसरे घर’ म्हणत भाजपाच्या प्रचार मोहिमेचा श्रीगणेशा केला.

हेही वाचा >>> विदर्भातील ११ पैकी आठ जिल्हे भाजपच्या अधिपत्याखाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी या रॅलीला प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते. मात्र पावसामुळे मोदी येथे पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी या रॅलीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी बोलताना मागील अनेक दशकांपासून देशाला स्थिर सरकार मिळालेले नव्हते. तसेच कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते. एखादे सरकार किती काळ टिकेल याची कोणालाही माहिती नव्हती. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशसहीत देशभरातील जनतेने देशात स्थिर सरकार यावे म्हणून मतदान केले, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> नरेंद्र मोदींना दिलेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिमाचल प्रदेश सरकारने आतापर्यंत तेथे काय-काय केले याबाबतची माहितीही नरेंद्र मोदी यांनी दिली. केंद्र तसेच राज्य सरकार यांच्यात समन्वय असल्यामुळे योजना ठरवणे तसेच सुप्रशासन सोपे झाले. हिमाचल प्रदेशमध्ये राष्ट्रय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी सुमारे १४ हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. हा निधी आधीच्या सरकारने दिलेल्या निधीच्या सात पट अधिक आहे. हिमाल प्रदेशमधील जनतेने वेगवेगळ्या क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे. भाजपामधील युवा कार्यकर्ते आपल्या कामातून देशासमोर एक उदाहरण ठेवत आहेत. येथे मुख्यमंत्र्यांपासून ते आमदार, खासदारांपर्यंत सगळे तरुण आहेत, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> त्रिपुरात भाजपामध्ये गळती सुरूच; आणखी एका आमदाराचा राजीनामा

दरम्यान, या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष हजेरी लावू शकले नाहीत. मात्र आगामी काळात हिमाचल प्रदेशला नक्की भेट देणार, असे आश्वासन मोदी यांनी या सभेला संबोधित करताना दिले. हिमाचल प्रदेशमध्ये १९९० सालापासून कोणत्याही पक्षाला पुन्हा सरकार स्थापता आलेले नाही. प्रत्येक निवडणुकीत येथे सत्ताबदल झालेला आहे. याच कारणामुळे येथे सत्ता कायम राखण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सांगलीत भाजपला यश मिळवून देण्याचे नव्या पालकमंत्र्यांसमोर आव्हान

संबंधित बातम्या

दादा भुसेंच्या पुत्राच्या वाढदिवस फलकांनी भाजप अस्वस्थ
कोल्हापूर दौऱ्यात राजकीय परीघ रुंदावण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न
“पंतप्रधान पदासाठी नितीश कुमारांनी धोका दिला”, अमित शाह यांचा हल्लाबोल, म्हणाले, “लालूजी तुम्हाला फसवून…”
काश्मीरमधील परिस्थितीला तीन घराणे जबाबदार, अमित शाह यांचा गंभीर आरोप
पालकमंत्री उदय सामंतांच्या सामोपचाराच्या भूमिकेमुळे ‘नियोजन’ची बैठक खेळीमेळीत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती