भारत सर्व समुदायांसाठी एक राष्ट्र असल्याने धर्म, भाषा किंवा ड्रेस कोडमध्ये एकसमानता स्वीकारू शकत नाही, असं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू संतश्री पंडित यांनी सांगितले. पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत जेएनयूच्या कुलगुरू संतश्री पंडित यांनी एकाच भाषेची जबरदस्ती करण्यास विरोध केला. विशेषत: ज्या राज्यांमध्ये हिंदीला व्यापकपणे स्वीकारले जात नाही, अशा राज्यांचे त्यांनी दाखले दिले आहेत.

“मी धर्म, वंश किंवा भाषेत एकसमानतेवर सहमत नाही. एक भाषा लादू नये. काही राज्यांमध्ये काही लोकांना ती (अधिकृत भाषा) हिंदीमध्ये बदलायची असेल तर ते करू शकतात. पण दक्षिणेत ते कठीण होईल. पूर्व भारतात, महाराष्ट्रातही मला हिंदी स्वीकार्य होईल, असे वाटत नाही,” असंही जेएनयू कुलगुरू म्हणाल्यात. मी म्हणेन की हिंदी एक भाषा असू शकते, पण एकच भाषा लादू नये. जेव्हा ते (जवाहरलाल) नेहरू आणि इंदिरा गांधी दोघेही त्रिभाषेच्या सूत्राबद्दल बोलत होते, तेव्हा ते मूर्ख नव्हते, कारण देशाला एका साच्यात बसवणं अशक्य आहे. भारतात कोणत्याही स्वरूपात एकसमानता चालत नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

पंडित यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतातील भाषेच्या प्रश्नांची संवेदनशीलता ओळखून एक भाषा असणे म्हणजे हळूहळू वाटचाल करण्यासारखं असल्याचा त्यांनी सल्ला दिला. सर्व भाषा चांगल्या आहेत. मी कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही पण माझ्यासाठी इंग्रजीमध्ये सर्वात सोपी आणि सोयीस्कर भाषा असल्याचंही त्यांनी अधोरेखित केले.

हेही वाचाः केरळमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच ५ पेक्षा जास्त जागा मिळतील! पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांचा विश्वास

भारत एका विशिष्ट समुदायासाठी नाही : जेएनयू कुलगुरू

पंडित यांनी भारतामध्ये एकच ओळख किंवा धर्म पुरेसा नाही, यावरही जोर दिला आहे. कोणत्याही विशिष्ट समुदायाच्या हिताचा विचार न करता विद्यापीठांनी ज्ञान देणं अन् संशोधनाला प्राधान्य देण्याची गरज आहे. इथे कोणताही एकच धर्म कार्य करेल असे मला वाटत नाही. कारण हे वैयक्तिक मुद्दे आहेत. विद्यापीठ म्हणून आपण सगळ्यांच्या वर असणे गरजेचे आहे. खरं तर आपल्यासाठी ज्ञान मिळवणे हे महत्त्वाचे असले पाहिजे. राष्ट्र हे एका विशिष्ट समुदायासाठी नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी ड्रेस कोडच्या विरोधात : संतश्री पंडित

शैक्षणिक संस्थांमधील ड्रेस कोडबाबत पंडित म्हणाल्या की, “मी ड्रेस कोडच्या विरोधात आहे. मला वाटते (शैक्षणिक) जागा खुल्या असाव्यात. जर कोणाला हिजाब घालायचा असेल तर ती त्यांची निवड आहे आणि जर कोणाला तो घालायचा नसेल तर त्यांच्यावर जबरदस्ती करू नये.” “जेएनयूमध्ये लोक शॉर्ट्स घालतात आणि पारंपरिक पोशाख घालणारे देखील आहेत, ही त्यांची वैयक्तिक निवड आहे. जोपर्यंत ते मला तसे करण्यास भाग पाडत नाहीत, तोपर्यंत मला काही अडचण नाही,” असं सांगत पंडित यांनी वैयक्तिक स्वायत्ततेच्या महत्त्वावर जोर दिला. पंडित यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेत सांस्कृतिक इतिहासाचे संतुलित प्रतिनिधित्व करण्याची गरज असल्याचे सांगितले. मुघल साम्राज्याला व्यापक प्रसिद्धी मिळत असताना चोल, मराठा, सातवाहन आणि काकतीयांसारख्या इतर महत्त्वपूर्ण भारतीय राज्यांकडे दुर्लक्ष केले जाते. भारतीय इतिहासात २०० वर्षांहून कमी काळ राज्य करणाऱ्या मुघलांनी इतिहासाची २०० हून अधिक पाने व्यापली आहेत. मी त्यांच्या विरोधात नाही, त्यांना त्यांचे स्थान द्या, परंतु आमच्याकडे चोलांचे, जागतिक स्तरावर सर्वात जास्त काळ राज्य करणारे राज्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडे अर्धेही नाहीत, असंही त्यांनी अधोरेखित केले. तसेच मराठे, सातवाहन किंवा काकतीया, अशी राज्ये अस्तित्वात होती हे तुम्हाला माहीत आहे का? हे अज्ञानामुळे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. आपल्याला आपल्या इतिहासाचा अभिमान असायला हवा. याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहू नका आणि धर्माला हाकलून द्या, असंही त्या म्हणाल्या आहेत.