आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपल्यामुळे देशातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजपाला पराभूत करायचेच, असा चंग विरोधी बाकावरील अनेक पक्षांनी केला आहे. भाजपाशी फारकत घेऊन बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलला(आरजेडी) सोबत घेणारे संयुक्त जनता दल पक्षाचे नितीशकुमार हेदेखील याच प्रयत्नात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील चेहरा म्हणूनही त्यांना अनेकजण पाहतात. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून विरोधकांनी एकत्र यायला हवे असे म्हणणाऱ्या नितीशकुमार यांच्यासाठी काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसची भूमिका आणि पुढाकार का महत्त्वाचा आहे? हे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> राजस्थान: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट अ‍ॅक्शन मोडमध्ये; थेट मोदी, ओवेसींना घेरलं, म्हणाले “हे दोघेही…”

विरोधकांची मोट बांधण्याचे आव्हान

नितीश कुमार यांनी बिहारमध्ये आरजेडीसोबत युती केलेली आहे. यालाच महागठबंधन म्हटले जाते. या महागठबंधनमध्ये माकप पक्षासह काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही भाजपाच्या विरोधात चांगली कामगिरी करू, असा विश्वास नितीशकुमार यांना आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपाप्रणित एनडीएने ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. आम्ही बिहारमध्ये चांगली कामगिरी करू, असा नितीशकुमार यांना विश्वास असला तरी संपूर्ण भारतभरात विरोधकांची मोट बांधण्याचे आव्हान विरोधी पक्षांवर आहे.

हेही वाचा >> खासगी फोटो लिक झाले आणि महिला IPS-IAS अधिकाऱ्यांमध्ये जुंपली; जाणून घ्या कोण आहेत डी रुपा आणि रोहिणी सिंधुरी?

भाजपा पक्षाचे भवितव्य याच १२ राज्यांवर अवलंबून

संयुक्त जनता दल तसेच नितशीकुमार यांच्या दृष्टीने विरोधकांना एकत्र करण्यात काँग्रेसची भूमिका फार महत्त्वाची आहे. संयुक्त जनता दलाच्या नेत्याने याबाबतचा तर्क सांगितला आहे. “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०३ जागा जिंकत बुहमत गाठले. मात्र भाजपाने या जागांपैकी जवळपास २६२ जागा म्हणजेच ८७ टक्के जागा या १२ राज्यांमधून जिंकल्या. म्हणजेच भाजपा पक्षाचे भवितव्य याच १२ राज्यांवर अवलंबून आहे. आपण भाजपावर या १२ राज्यांमध्ये हल्ला केला, तर त्यांना चांगलाच हादरा बसेल,” असे संयुक्त जनता दलाच्या नेत्याने सांगितले.

हेही वाचा >> वायएस शर्मिला तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात; पदयात्रेची परवानगीही केली रद्द

भाजपाला बहुमत देणारी १२ राज्यं कोणती?

भाजपाला साथ देणाऱ्या प्रमुख १२ राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. आसाम (९ जागा), बिहार (१७ जागा), गुजरात (२६ जागा), हरियाणा (१० जागा), कर्नाटक (२५ जागा), मध्यप्रदेश (२८ जागा), महाराष्ट्र (२३ जागा), राजस्थान (२४ जागा), उत्तर प्रदेश (६२ जागा), पश्चिम बंगाल (१८ जागा), छत्तीसगड आणि झारखंड (११ जागा) या १२ राज्यांचा जोरावरच भाजपाने केंद्रात सत्ता मिळवली आहे. या १२ राज्यांपैकी आसाम, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या सात राज्यांत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत आहे. तर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांतही काँग्रेसला जनाधार आहे. त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीसाठी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे.

हेही वाचा >> संजय राऊतांच्या ‘२ हजार कोटीं’च्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांचे जशास तसे उत्तर; म्हणाले, “अशा निर्बुद्ध…”

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत मी विरोधकांच्या बाजूने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नाही, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केलेले आहे. मात्र या निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्यासाठी त्यांच्यावर समन्वयकाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे संयुक्त जनता दलाच्या नेत्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसची आणि नितीशकुमार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar trying for opposition unity for upcoming general election how congress is important prd
First published on: 21-02-2023 at 17:54 IST