चंद्रशेखर बोबडे

नागपूर : सत्ताप्राप्तीसाठी काहीही करणा-या भारतीय जनता पक्षाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे या दोन दिग्गज नेत्यांच्या गृह जिल्ह्यात ( नागपूर) पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत घक्कादायक नामुष्कीला सामोरे जावे लागले. १३ पैकी एकाही पंचायत समितीमध्ये भाजपला सभापतीपद जिंकता आले नाही. १३ पैकी ९ ठिकाणी काँग्रेस, ३ तालुक्यांत राष्ट्रवादी आणि एका ठिकाणी शिंदे गटाचा सभापती झाला आहे.

हेही वाचा… पुत्र टाळती चूक पित्याची! अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे दौऱ्यावर दौरे

नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकी दोन काँग्रेस, दोन भाजप आणि प्रत्येकी एक राष्ट्रवादी व अपक्ष ( आता शिंदे गट) अशी विभागणी आहे. पंचायत समिती सभापती तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतो. या पदावर भाजपचा एकही सदस्य नसणे ही बाब अडीच वर्षानंतर होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी चिंता वाढवणारी आहे.

हेही वाचा… बबनराव लोणीकरांचे मंत्रीपद हुकल्याने आता मुलावर नवी जबाबदारी!

ज्याच्याकडे संख्याबळ त्याच्याकडे पंचायत समिती सभापतीपद असा ढोबळ अंदाज या निवडणुकीत खरा ठरत नाही. कारण सभापतीपदाचे आरक्षण महत्त्वाचे असते. अनेकदा बहुमतात असलेल्या पक्ष किंवा गटाकडे सभापतीपदासाठी आरक्षित संवर्गातील सदस्य नसेल तर त्यांना या पदावर पाणी सोडावे लागते. पण भाजपचा अलीकडच्या काळातील राजकीय इतिहास हा तोडफोडीच्या राजकारणाचा आहे. सत्तेसाठी अनुकूल ज्या गोष्टी पक्षाकडे नाहीत त्या इतर पक्ष फोडून आणायच्या व सत्ता काबीज करायची. या पार्श्वभूमीवर भाजपला जास्तीत जास्त सभापतीपदे पक्षाकडे खेचून आणने अवघड नव्हते. प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांना जिल्ह्याच्या राजकारणाची खडान् खडा माहिती होती. पण त्यांच्या कामठी पंचायत समितीचे सभापतीपद भाजपला राखता आले नाही. अशीच अवस्था पक्षाच्या इतर आमदारांची झाली. शिंदे गटाचे आमदार आशीष जयस्वाल यांनी मात्र त्यांच्या रामटेक पंचायत समितीचे सभापतीपद भाजपच्या मदतीने राखले.

हेही वाचा… साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

पक्षनिहाय पंचायत समित्या

काटोल : राष्ट्रवादी

नरखेड : राष्ट्रवादी

हिंगणा : राष्ट्रवादी

सावनेर : काँग्रेस

कळमेश्वर :काँग्रेस

पारशिवनी : काँग्रेस

रामटेक : बाळासाहेबांची शिवसेना

कामठी : काँग्रेस

मौदा : काँग्रेस (ईश्वरचिट्ठी)

कुही : काँग्रेस

उमरेड :काँग्रेस

भिवापूर :काँग्रेस

नागपूर :काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस : ३

काँग्रेस : ०९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे गट :१