नोव्हेंबर महिन्यात राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या राज्यातील निवडणुकीसाठी उभे असणारे उमेदवार किंवा आता असणारे आमदार यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर मिझोराममधील महिला उमेदवारांचा संघर्ष अधिक आहे. मिझोरामची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत केवळ चारच महिलांनी आमदारपद भूषविले आहे. अगदी आताच्या ४० विधानसभा सदस्यांमध्ये एकाही महिलेला आमदारकी मिळाली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मिझोराममध्ये महिलांना संघर्ष का करावा लागत आहे, तिथे महिला आमदार का नाहीत, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा : आझम खान खोट्या कागदपत्रप्रकरणी दोषी; बनावट जन्मप्रमाणपत्र प्रकरणी कोणती शिक्षा होते ?

chavadi maharashtra politics maharashtra political crisis
चावडी: एका रात्रीत मनपरिवर्तन
prakash javadekar kerala lok sabha marathi news
केरळमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच ५ पेक्षा जास्त जागा मिळतील! पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांचा विश्वास
Harsimrat Kaur Badal
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरू, तीन टर्म खासदार राहिलेल्या हरसिमरत कौर बादल यांना लोकसभेचे तिकीट मिळणार का?
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?

७ नोव्हेंबर रोजी मिझोराममध्ये निवडणुका होणार आहेत. याकरिता १७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये १६ महिला उमेदवार आहेत. सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या महिला उमेदवारांपैकी तीन भाजपच्या आणि प्रत्येकी दोन मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ), झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) आणि काँग्रेसच्या आहेत. बाकी अपक्ष महिला आहेत. परंतु, या १६ महिलांनाही निवडणुकीची तयारी करताना अनेक समस्या येत आहेत. या महिला उमेदवारांपैकी केवळ काँग्रेसच्या उमेदवार वनलालॉम्पुई चॉंगथू या यापूर्वी आमदार होत्या.

हेही वाचा : मोईत्रा यांच्या प्रकरणामध्ये भाजपाचा पक्षपातीपणा; दानिश अली यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

२०१४ साली झालेल्या हरंगतुर्जो या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली होती. चॉंगथू यांनी ही निवडणूक जिंकली होती. मिझोरामच्या निर्मितीपासून म्हणजेच १९८७ सालापासून २०१४ सालापर्यंत या राज्यात एकही महिला आमदार नव्हती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि रेशीम, मत्स्यव्यवसाय आणि सहकार मंत्रिपद भूषवले. परंतु, चॉंगथू २०१८ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यावेळी काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या त्या एकमेव महिला उमेदवार होत्या. परंतु, त्या निवडणुकीत एकाही महिलेला आमदारपद मिळाले नाही. २०१८ मिझो नॅशनल फ्रंटने सरकार स्थापन केले परंतु, त्यांनी एकही महिलेला उमेदवारी दिली नाही. २०१८ मध्ये निवडणूक लढवलेल्या १६ महिला उमेदवारांपैकी दोन महिला उमेदवार वगळता बाकीच्यांची अनामत रक्कम जप्त झाली.

हेही वाचा : दक्षिण राजस्थानमध्ये आदिवासींची मते काँग्रेस-भाजपसाठी निर्णायक ठरणार का ?

२०१३ च्या निवडणुकीत फक्त आठ महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मिझोराममध्ये महिलांची संख्या कमी आहे, असे नाही. राज्यात महिला मतदार अधिक आहेत, महिलांच्या मतदानाचीही टक्केवारी पुरुषांच्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षा जास्त आहे. मिझोराममध्ये सध्या ४,३८,९२५ महिला मतदार आणि ४,१२,९६९ पुरुष मतदार आहेत. २०१३ मध्ये, ८२.१२ टक्के महिलांनी आणि ७९.५ टक्के पुरुषांनी, तर २०१८ मध्ये ८१.०९ टक्के महिलांनी आणि ७८.९२ टक्के पुरुषांनी मतदान केले.

महिलांसमोरील आव्हाने

लुंगलेई पश्चिम येथील भाजपच्या उमेदवार आर बियक्तलुआंगी यांनी सांगितले की, या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. ”इथल्या लोकांकरिता महिलेने निवडणूक लढवणे, ही नवीनच गोष्ट आहे. परंतु, मतदारराजा कृपा करेल, असे वाटते,” हेही त्यांनी नमूद केले. त्यांनी राज्य सरकारच्या मला वाटते की मी मजबूत स्थितीत आहे. इथल्या लोकांसाठी महिला उमेदवार असण्याची ही पहिलीच वेळ आहे पण ते खूप दयाळू आहेत,” बियक्तलुआंगी ६५ वर्षीय असून राज्य सरकारसाठी त्यांनी ४२ वर्षे काम केलेले आहे.

३२वर्षीय बरील वन्नेहसांगी सध्या आयझॉल मिझोराम कौन्सिलमधील नगरसेवक आहेत. त्यांना झोराम पीपल्स मूव्हमेंटने ऐझॉल दक्षिण-३ या मतदारसंघाकरिता उमेदवारी दिली आहे. आपल्या त्यांना महिलांविषयी तसेच महिला आमदारांविषयी असणारे पूर्वग्रह बदलायचे आहेत, असे त्यांनी प्रचारादरम्यान सांगितले. ”आम्ही पुरुषप्रधान समाजामध्ये जन्माला आलो, त्यांच्यामध्ये वाढलो. आज आम्ही पुरुषांसह लढत आहोत. हे आव्हान आहे, निवडणुकीत पुरूष विरोधात असणं यामध्ये चूक काहीच नाही. पुरुषप्रधान सत्तेमुळे महिला आमदार जिंकल्या, तरी त्या पुरुषी सत्तेचं ऐकतील, असे लोकांना वाटते. पण, असे होणार नाही. जिथे अन्याय होईल, तिथे आम्ही आवाज उठवूच. मी निवडून आल्यास पूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करेन,” असे वनेहसांगी यांनी सांगितले.

काँग्रेसच्या दोन महिला उमेदवारांपैकी लुंगलेई साऊथमधून निवडणूक लढवणाऱ्या मरियम ह्रंगचल यांना आधीच विरोधाचा सामना करावा लागत आहे. कारण, त्यांनी बिगरमिझो पुरुषाशी लग्न केल्यामुळे मिझो झिरलाई पॉल या राज्याच्या विद्यार्थी संघटनेकडून त्यांना विरोध केला जातोय.