परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान अवघे पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे. आता आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होण्याऐवजी ‘स्थानिक’ विरुद्ध ‘परका’ यासह जातीपातीच्या विषयावर येऊन ठेपली आहे. महायुतीकडे मतदारसंघातला एकही उमेदवार नव्हता का, मतदाराचे काही काम पडले तर साताऱ्याला जायचे का, अशी टीका खासदार संजय जाधव यांच्याकडून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यावर केली गेली. तर तुमचा लोकसभेचा विकासनिधीसुद्धा तुम्ही वापरू शकला नाही. परभणीकरांना प्यायला पाणी नाही. दहा वर्षांत तुम्ही केले काय, असा सवाल जानकर यांच्याकडून खासदार जाधव यांना उपस्थित केला जात आहे.

सध्या लोकसभा मतदारसंघात जातीपातीची गणिते लावली जात आहेत. मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय, असा प्रश्न महायुतीचे उमेदवार जानकर यांना वारंवार विचारला जाऊ लागला आहे. माझ्यावर टीका करायला कोणतेही कारण नाही. त्यामुळे माझे विरोधी मित्र कुठलातरी बहकावा निर्माण करत आहेत. माळी, मराठा, धनगर ही एकाच आईची मुले आहेत, असे महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ या ग्रंथात लिहिले आहे. शाहू महाराजांनी पहिला धनगर- मराठा विवाह घडवून आणला, असे प्रतिपादन जानकर यांच्या भाषणात सातत्याने पाहायला मिळत आहे.अजूनही लोकसभा निवडणुकीत विकासाचे मुद्दे चर्चेत येण्याऐवजी जातीय ध्रुवीकरणाचाच प्रयोग पाहायला मिळत आहे.

beed lok sabha latest marathi news, beed lok sabha election 2024
मतदारसंघाचा आढावा : बीड; जातीय ध्रुवीकरणाचा फायदा कोणाला ?
sangli lok sabha marathi news, bjp sanjaykaka patil sangli marathi news, vishal patil sangli marathi news
सांगलीतील चित्र बदलले, भाजप – अपक्षात चुरस
Devendra Fadnavis on Eknath Shinde
“एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…”, ठाणे लोकसभेवरून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
Dhule lok sabha, BJP,
मतदारसंघाचा आढावा : धुळे; विरोधी मतांचे विभाजन टळल्याने भाजपपुढे आव्हान
yogendra yadav latest news
“महाराष्ट्रात भाजपाप्रणीत एनडीएच्या २० जागा कमी होणार”, योगेंद्र यादव यांनी वर्तवला अंदाज; म्हणाले, “४८ जागांपैकी…”
parbhani lok saha seat mahayuti focus on divide maratha voting
परभणीत मराठा मतांच्या विभाजनावर महायुतीची भिस्त
lok sabha election 2024 level of promotion in Beed fell to caste of chief officers
बीडमधील प्रचाराचा स्तर प्रमुख अधिकाऱ्यांच्या जातीपर्यंत घसरला
Parbhani Lok Sabha, Mahadev Jankar,
मतदारसंघ आढावा : परभणी… जातीय समीकरणांची आकडेमोड आणि फेरमांडणी

हेही वाचा : इराणींनी अमेठीत बांधलं घर; उमेदवाराने मतदारसंघातील रहिवासी असणे आवश्यक आहे का?

विद्यमान खासदार संजय जाधव यांनी आमदारकीची दहा तर खासदारकीची दहा अशा २० वर्षांत कोणती विकासकामे केली, असा प्रश्न त्यांच्या विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. जानकर यांच्यासोबत असलेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार जाधव यांच्यावर जाहीर सभांमधून टीका होत आहे तर जानकर यांच्यावरही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ते बाहेरील उमेदवार असल्याचा प्रचार केला जात आहे. लोकसभा मतदारसंघात महायुतीकडे जिल्ह्यातला एकही उमेदवार नव्हता का? गेल्या अनेक वर्षांपासून जी व्यक्ती आपल्या माय-बापाला भेटू शकली नाही ती मतदारांना काय भेटणार, अशी टीका खासदार जाधव यांनी जिंतूर येथील एका कार्यक्रमात केली. आपण एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून आपण देशातून कुठूनही निवडणूक लढवू शकतो, असा युक्तिवाद यावर जानकर यांच्याकडून केला जात आहे. कधी ‘स्थानिक’ विरुद्ध ‘परका’ तर कधी जातीपातीचा रंग देत सध्या प्रचार सुरू असून परभणी लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचे प्रारूप काय हे मात्र कोणीच सांगताना दिसत नाही. अजूनही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होण्यापेक्षा जातीपातीच्या आरोप- प्रत्यारोपांवर लढली जात असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : Loksabha Election 2024: महाराष्ट्र-तेलंगणा: ‘या’ १४ गावांतील लोक दोन राज्यात बजावतील मतदानाचा हक्क, नेमके प्रकरण काय?

पालम तालुक्यातील भोगाव या ठिकाणी असलेल्या मारुती मंदिरात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे येणार होते. मात्र, मराठा आंदोलकांनी त्यांना गावात येण्याआधीच रोखले. सुरुवातीला पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा आणि पाठीमागे जानकर यांचे वाहन होते. मात्र, गावाच्या फाट्यावरच आंदोलकांनी पदाधिकाऱ्यांच्या गाड्या रोखल्या. यावेळी किमान उमेदवारांची भूमिका समजून घ्या असे समजून सांगण्याचा प्रयत्न महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून होत होता. मात्र, आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पदाधिकाऱ्यांना थांबावे लागले. यावेळी आंदोलकांच्या हातात काळे झेंडे होते. घोषणाबाजी करत आंदोलकांनी जानकरांना विरोध दर्शवला.

हेही वाचा : उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज

सध्या दोन्ही बाजूंनी प्रचाराला धार आल्याचे जाणवत आहे. महायुती व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मतदारसंघातल्या जातीपातीच्या गणितांची आखणी करत आहेत. मराठा, मुस्लिम, ओबीसी, दलित अशा सर्व मतांची आकडेमोड केली जात आहे. आपणास मराठा समाजाचा पाठिंबा असून बबनराव लोणीकर, बोर्डीकर, विटेकर हे सर्व मराठा नेते आपल्या सोबत आहेत, असा दावा जानकर यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाला जाती-जातीत भांडणे लावायची असून कोणत्याही एका जातीवर निवडून येता येणार नाही. सर्व समाजाच्या मतांवरच निवडून येता येईल, असे खासदार जाधव यांनी जिंतूरच्याच मेळाव्यात सांगितले. विशेष म्हणजे आपण हॅट्रिक करणार असा खासदार जाधव यांचा दावा असून दुसऱ्या बाजूने महादेव जानकर यांनीही आपण किमान दोन लाखांच्या फरकाने विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे.