भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आपली लोकांमधील प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न राहुल गांधी करताना दिसत आहेत. राहुल गांधी लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये फार न मिसळणारे नेते आहेत अशी प्रतिमा विरोधकांनी उभी केली होती याच प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी करीत आहेत. ३५७० किमीच्या भारत जोडो यात्रेचा शुभारंभ आज पासून करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या आत्तापर्यंतच्या राजकारणात ही सर्वत पदयात्रा असल्याचं म्हटलं जातं आहे.

२०१९ मध्ये मिळालेल्या दारुण पराभव नंतर काँग्रेसला स्वबळावर एकही विधानसभा निवडणूक जिंकता आली नाही. यासाठी काँग्रेस पक्षाच्या आतील आणि  बाहेरील टीकाकारांनी सर्वस्व राहुल गांधी यांना जबाबदार धरले. गैर गंभीर आणि अनिच्छुक असल्याचं लेबल त्यांच्यावर लावण्यात आलं. ३,५७० किमीच्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पक्षाचे बिघडलेले नशीब आणि त्यांची घसरलेली प्रतिमा दोन्ही बदलण्याचा प्रयत्न करताना राहुल गांधी दिसत आहे.

कन्याकुमारीपासून सुरुवात करून, राहुल आणि विविध राज्यांतील १०० “भारत यात्री” यांनी पुढील वर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीस श्रीनगरमध्ये त्यांची महत्त्वाकांक्षी ओडिसी पूर्ण करण्याची योजना आखली आहे. राहुलची पदयात्रा अनेक बाबींमध्ये अद्वितीय आहे – कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पायी चालणारे ते गेल्या चार दशकांतील पहिले राजकारणी असतील. ते ट्रकवर बसवलेल्या कंटेनरमध्ये रात्री मुक्काम करतील. १९८० च्या दशकात तत्कालीन जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी कन्याकुमारी ते दिल्ली असा प्रवास केला होता. तेव्हा ते ५६ वर्षांचा होता. इतर नेत्यांनी तेव्हापासून भारत यात्रा काढली होती, पण ‘रथ’ किंवा बसेसवर. पायी चालणारे चंद्रशेखर नंतर राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत.

कन्याकुमारीमधील, महात्मा गांधी मंडपममध्ये प्रार्थना सभेला जाण्यापूर्वी राहुल तिरुवल्लुवर स्मारक, विवेकानंद स्मारक आणि कामराज स्मारकाला भेट देतील. सार्वजनिक रॅलीला संबोधित करण्यापूर्वी राहुल गांधी  तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडून राष्ट्रध्वज स्वीकारतील, जिथे यात्रेचा औपचारिक शुभारंभ सर्व प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत केला जाईल. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित असतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत जोडो यात्रा भारतीय राजकारणासाठी एक “परिवर्तनात्मक क्षण” आणि पक्षाच्या कायाकल्पासाठी “निर्णायक क्षण” असेल. असा विश्वास काँग्रेस पक्षाने व्यक्त केला आहे.पुढील १५० दिवसांत ही यात्रा १२ राज्यांतून जाणार आहे. तामिळनाडूतून, ती केरळमध्ये जाईल आणि कर्नाटकात प्रवेश करेल, या प्रमुख राज्यामध्ये पुढील उन्हाळ्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हुसकावून लावण्याची जोरदार संधी काँग्रेस या माध्यमातून करण्याच्या तयारीत आहे. या नंतर ही यात्रा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून जाईल, जेथे पुढील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरातमध्ये निवडणुका अगदी जवळ असल्यामुळे यात्रेतून गुजरातला वगळले जाईल. यात्रेचा पहिला महिना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुहूर्तावर येणार आहे. निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेले राहुल रस्त्यावर उतरणार असले तरी, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान सर्वांच्या नजरा २४, अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयाकडे असतील.