अलिबाग : निवडणूक रायगड मतदारसंघाची असली तरी निवडणूकीचा प्रचार मात्र मुंबईत सुरु झाला आहे. मुंबईकर चाकरमान्यांना मतांसाठी पायघड्या घालण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरु केले आहेत. महायुतीचे सुनील तटकरे यांनी दादर मध्ये तळा, म्हसळा आणि श्रीवर्धन मधील मतदारांच्या बैठका घेऊन मुंबईकरांना साकडे घातले.

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. रायगड जिल्ह्यातील हजारो मतदार कामा निमित्ताने मुंबईत स्थायिक आहेत. या मुंबईकर मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदार संघात मुंबईकरांना गाठण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरु केले आहेत. शिवसेनेच्या अनंत गीतें पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी विभागवार बैठकांचे आयोजन सुरु केले आहे. मुंबईत स्थायिक असणाऱ्या मतदारांना एकत्र करून मतदानासाठी येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

shivraj patil chakurkar, Dr archana patil chakurkar, latur, amit deshmukh, congress, bjp
शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक आनंदी
kolhapur lok sabha marathi news, kolhapur sanjay mandlik latest news in marath
काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

हेही वाचा : जरांगे यांच्या निर्णयानंतर ‘मराठा मतपेढी’ ला आकार येण्याबाबत साशंकता

कोकणातील अनेक गावांमध्ये गाव पंचायत कार्यरत आहेत. या गावपंचायती मार्फत आजही गावाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्था संभाळली जाते. यात गावागावातील मुंबईकर मंडळ महत्वाची भुमिका बजावत असतात. गावाला आर्थिक पाठबळ देण्यात त्यांच्या मोठा सहभाग असतो. त्यामुळे मुंबईकर मंडळांना गावात महत्वाचे स्थान असते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईकर मंडळांना आणि मतदारांना चुचकारण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरु केले आहेत.

मुंबईत जाऊन गावमंडळांना गाठून त्यांच्या एकत्रीत बैठका घेणे, छोटेखानी सभा घेऊन त्यांना मतदानासाठी साकडे घालणे, त्यांची येण्याजाण्याची व्यवस्था लावून देणे यासारखे नियोजन सुरु झाले आहे. शिवसेनेनी सुरुवातीला मुंबईत गाव मंडळाच्या बैठका घेतल्या. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुंबईत दादर येथे निवडणूक प्रचाराला सुरवात केली आहे.

हेही वाचा : प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीने सांगलीतील समीकरणे बदलणार ?

गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीतही जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचारासाठी हाच फंडा वापरला होता. मुंबई, सह सुरत आणि बडोदा येथे कामासाठी स्थायिक झालेल्या रायगडच्या मतदारांना गाठले होते, आणि नंतर मतदानासाठी सर्वाना बोलवून घेतले होते.

हाच फंडा आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीत दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांकडून वापरला जात असल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय तटकरे यांनी रविवारी दादर येथे श्रीवर्धन मतदारसंघातील तळा, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील मतदारांसाठी घेतलेल्या सभेत आला. आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी सभेच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा : बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच

मतदारसंघाच्या विकासासाठी काही राजकीय भुमिका घ्याव्या लागतात. मात्र हे करतांना पक्षाने आपले फुले शाहू आंबेडकरांचे विचार सोडले नसल्याचे यावेळी तटकरे यांनी सांगितले. गीते सहा वेळा लोकसभेवर निवडून गेले. दोन वेळा मंत्री झाले, पण मंतदारसंघासाठी त्यांनी काय केले असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा साथ द्या असे भावनिक आवाहन त्यांनी मुंबईकर मतदारांना यावेळी केले.