केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे ज्येष्ठ तेलुगू अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री यू व्ही कृष्णम राजू यांच्या शोकसभेला उपस्थिती लावली आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट देखील घेतली आहे. याशिवाय यावेळी राजनाथ सिंह यांनी कृष्णम राजू यांचा पुतण्या आणि बाहुबली फेम अभिनेता प्रभासची देखील भेट घेतली आहे.

भाजप खासदार या नात्याने राजू यांनी गोहत्या बंदी विधेयक – २००० यासाठी लोकसभेत प्रस्ताव मांडला होता. जे की तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांनी गोहत्येवर पूर्ण बंदी आणण्यासाठी वर्षभराअगोदर सर्वप्रथम मांडले होते. यानंतर हा प्रस्ताव मतदानासाठी ठेवण्यात आला आणि स्वीकारण्यात देखील आला. राजू हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्रीही होते.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन तेलुगू राज्यांमध्ये प्रचंड फॅन फॉलोइंग असलेल्या अभिनेता प्रभासशी जुडण्याची ही संधी राजू यांच्या शोकसभेमुळे भाजपाला मिळेल. राजूने प्रभासची केवळ तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतच नव्हे तर भाजपशीही ओळख करून दिली होती, २०१५ मध्ये त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी नवी दिल्लीत नेले होते. मात्र, प्रभास आतापर्यंत राजकारणापासून दूर राहिलेला आहे. भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी एक असणारा प्रभास हा चित्रपट निर्माता यू सूर्यनारायण राजू यांचा मुलगा आहे.

याशिवाय, प्रभास हा दुसरा तेलुगू फिल्मस्टार आहे ज्याच्याशी भाजपाने अलीकडच्या काही दिवसांत संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. २१ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणाच्या दिवसभराच्या भेटीदरम्यान तेलगू देशम पार्टी (टीडीपी) चे संस्थापक एन टी रामाराव यांचा आणि नातू तेलुगू स्टार ज्युनियर एनटीआरची हैदराबाद येथे भेट घेतली होती. ज्युनियर एनटीआरने तेलगू ब्लॉकबस्टर चित्रपट “आरआरआर” मध्ये भूमिका केली आहे.

सुपरस्टार ज्युनियर एनटीआर राजकारणात सक्रिय होणार? अमित शाहांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

तथापि, तरुणांमध्ये प्रभासची असणारी प्रचंड लोकप्रियता आणि त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. अशावेळी भाजपा जर प्रभासला जर आपल्याबाजून वळवण्यास यशस्वी झाली तर, भाजपाला निश्चितच मोठा फायदा होऊ शकतो.

एकीकडे प्रभास आणि एनटीआर ज्युनियर, जो तेलगू देसम पार्टी (टीडीपी) ला पाठिंबा देणार्‍या शक्तिशाली कम्मा समुदायाशी संबंधित आहे आणि त्याच्या अनेक फॅन क्लबने त्याला त्यांच्या जातीचे प्रतीक म्हणून दाखवले आहे. तर दुसरीकडे, भाजपला तेलंगणातील दोन प्रभावशाली सुमदायांपर्यंत पोहचण्याची आशा देखील आहे.