नवी दिल्ली ; राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार गटाने केलेल्या याचिकेवर गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २९ तारखेला संपणार असल्यामुळे तत्पूर्वी याबाबत निर्णय दिला जावा, अशी याचिकाकर्त्यांची अपेक्षा आहे.

हेही वाचा >>> Supriya Sule : “मला जे अजितदादा आठवतात त्यांना दिल्लीला जाणं आवडत नाही, कारण…”; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

पक्षाच्या दोन्ही गटांना चिन्हाच्या वापरापासून रोखण्याच्या मागणीसाठी ही याचिका करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालयाला सांगितले की, याचिकेवर आज सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र खटल्यांच्या सूचीमध्ये याचा समावेश नाही. त्यावर, ‘यापूर्वीच न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिला होता आणि तो दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आला होता,’ असे न्यायालयाने म्हटले. मात्र अजित पवार गटाकडून आदेशाचे पालन होत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत २९ तारखेला संपणार असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती वकिलांमार्फत शरद पवार गटाने केली. तर आपल्या काही उमेदवारांनी याआधीच अर्ज भरल्याचा मुद्दा अजित पवार गटाने मांडला.

Story img Loader