सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर सोलापूर शहरात या पक्षाने तुतारी वाजवत शोभायात्रा काढली. ही शोभायात्रा सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून फिरविण्यात आली. या माध्यमातून या पक्षाने सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलल्याचे पाहायला मिळाले खरे; परंतु हे आव्हान राष्ट्रवादी शरद पवार गटाला झेपेल काय, याचे उत्तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतूनच स्पष्ट होणार आहे.

एकेकाळी कम्युनिस्ट आणि नंतर काँग्रेसने वर्चस्व राखलेला सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ मागील २५ वर्षांपासून अभेद्य गड मानला जातो. १९९९ सालचा अपवाद वगळता १९९० सालापासून भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व कायम राखले आहे. या पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख हे २००४ सालापासून या मतदारसंघातून सातत्य टिकवून प्रतिनिधित्व करीत आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद वरचेवर वाढत असल्याचे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदानावरून दिसून येते.

Akola Lok Sabha, Prakash Ambedkar, BJP,
प्रकाश आंबेडकर, भाजप, काँग्रेसमधील तिरंगी लढतीचा फायदा कोणाला ?
Amol Kolhes wealth doubled in five years
अमोल कोल्हे यांची संपत्ती पाच वर्षांत झाली दुप्पट
lok sabha election 2024 congress in limelight after kanhaiya kumar nominated from north east constituency in delhi
कन्हैया कुमारांमुळे दिल्लीत काँग्रेस चर्चेत
BJP test, Congress, West Nagpur,
काँग्रेसच्या गडात भाजपची कसोटी, पश्चिम नागपूरमध्ये कडव्या झुंजीचे संकेत

हेही वाचा – आमदार भास्कर जाधवांचे मुलाच्या उमेदवारीसाठी दबाव तंत्र ?

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचत्या वतीने माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे यांनी भाजपला आव्हान देण्याची तयारी हाती घेतली आहे. शहरातील पक्षाची सूत्रे कोठे यांच्याच ताब्यात आहेत. सोलापूर शहराचा परिसर तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाने सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघापुरतेच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाने कोंतम चौकातील महात्मा बसवेश्वर पुतळ्यापासून तुतारी वाजवत धुमधडाक्यात शोभायात्रा काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत निघालेल्या या शोभायात्रेत राष्ट्रवादीचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले होते. पक्षाने तुतारी वाजविल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात हेदराबाद रस्त्यावर इंदिरा गांधी विडी घरकूल परिसरात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि दोन्ही गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी राष्ट्रवादीचे महेश कोठे व त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांच्यासह इतरांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वीच सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ संवेदनशील बनू लागल्याची चिन्हे पायायला मिळत आहेत.

हेही वाचा – शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसह राजकीय विरोध सुरू, निवडणूक प्रचारात मुद्दा तापणार

महेश कोठे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असून नंतर शिवसेनेत जाऊन तेथून परत राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रदीर्घ सत्ताकारणात महेश कोठे यांचे दिवंगत वडील विष्णुपंत कोठे हे सुशीलकुमारांची स्थानिक राजकीय सूत्रे सांभाळत होते. २००९ साली विधानसभा निवडणुकांमध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसतर्फे सुशीलकुमारांच्या कन्या प्रणिती शिंदे तर शहर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी प्रणिती शिंदे निवडून आल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाने शहराची सारी सूत्रे सुपूर्द केल्यानंतर आगामी विधानसभा लढविण्याच्या मुद्यावर महेश कोठे यांची चलबिचल अवस्था झाली होती. आता त्यांनी शहर मध्य मतदारसंघाचा विचार बाजूला ठेवून शहर उत्तर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.

शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महेश कोठे यांची ताकद विखुरली आहे. विशेषतः त्यांचा स्वतःचा विणकर पद्मशाली समाजासह त्यांना मानणाऱ्या इतर समाजातील कार्यकर्त्यांचे जाळे त्यांच्या पाठीशी आहे. शहर उत्तर मतदारसंघातून त्यांनी आपले भवितव्य पुन्हा एकदा अजमावून पाहण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने त्यांनी मतांची पेरणी सुरू केली आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांना महेश कोठे यांनी आव्हान दिल्यास ते परतावून लावणे वाटते तेवढे सहज सोपे दिसत नाही. जुन्या विडी घरकूल परिसरात विकास कामातून तयार केलेल्या रस्त्याच्या उद्घाटनावरून देशमुख व कोठे यांच्यात श्रेयवादाची लढाई झाली आणि त्याचे पर्यवसान दोन्ही गटांत हाणामारीत होताना महेश कोठे व इतरांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या कारवाईबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार देशमुख यांच्या पायाखालील वाळू घसरत चालल्याचा आरोप महेश कोठे यांनी केला आहे.

हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”

आमदार विजयकुमार देशमुख हे मात्र कोठे यांच्या आरोपाचे खंडन न करता शांतच असल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार विजयकुमार देशमुख आणि महेश कोठे यांच्या गटात टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातून हा मतदारसंघ संवेदनशील होऊन प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.