एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार गटाने सोलापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यादृष्टीने पक्षाच्या नेत्यांचे दौरे वरचेवर वाढले आहेत. जिल्हा ग्रामीण भागात तालुका पातळीवरील बहुसंख्य सरदार अजित पवार गटाला जाऊन मिळाले असताना इकडे सोलापूर शहरात पक्षाची ताकद अद्याप तरी कायम आहे.

Leaders of Mahavikas Aghadi ignore Yavatmal-Washim
महाविकास आघाडीच्या नेत्यांची यवतमाळ-वाशिमकडे पाठ?
Prakash Ambedkar, North Indians,
“भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
mahayuti eknath shinde and devendra fadanvis
जागावाटपाचे खडाष्टक सुरूच; भाजपच्या कुरघोडय़ांनी शिंदे गट अस्वस्थ, तर मविआत राऊतांवर काँग्रेस संतप्त

आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजपचा मजबूत बालेकिल्ला ठरलेला सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ ताब्यात घेण्याच्या ईर्षेने शरद पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे यांचे दौरे होऊन त्यांच्या उपस्थितीत शहर उत्तर मतदारसंघात पक्षाचे मेळावे-बैठका झडल्या. लवकरच स्वतः शरद पवार यांचाही दौरा याच मतदारसंघासाठी होत आहे. परंतु एकीकडे ही जोरदार तयारी सुरू असली तरी दुसरीकडे भाजपच्या ताब्यातून शहर उत्तर मतदारसंघ हिसकावून घेणे हे तेवढे सहज सोपे नाही. त्यासाठी किमान एक लाख मते मिळविण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.

हेही वाचा >>> मिझोरम : तिकीट नाकारल्यामुळे MNF पक्षातील बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश!

सोलापुरात अलिकडे झालेल्या राजकीय उलथापालथीत नेहमीच धरसोडीची भूमिका घेणारे माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे हे अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटात स्थिरस्थावर झाले आहेत. स्थानिक पातळीवर पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शहरातील राजकारणाचा विशेषतः सोलापूर महापालिकेतील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले महेश कोठे यांचे आमदारकीचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचा आधार घेऊनही पराभूत झालेले कोठे यांची अजूनही आमदारकीची महत्वाकांक्षा कायम आहे. सोलापूर शहर उत्तर किंवा शहर मध्य हे दोन्ही पर्याय कोठे यांच्यासमोर आहेत. त्यांनी शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभा लढविण्याच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसत असले तरी पलिकडे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्यच्या जागेवरही त्यांचा डोळा दिसून येतो.

हेही वाचा >>> तेलंगणामध्ये भाजपचे ओबीसींना प्राधान्य

दोन्ही काँग्रेसच्या विधानसभा जागा वाटपाच्या समझोत्यात पूर्वी काँग्रेसच्या ताब्यात राहिलेली शहर उत्तरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यादृष्टीने आगामी निवडणुकीसाठी या जागेवर महेश कोठे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे विश्वासू सहकारी असताना कोठे यांनी २००९ साली याच शहर उत्तरची जागा काँग्रेसकडून लढविली होती. परंतु त्यावेळी भाजपचे माजी मंत्री विजय देशमुख हे कोठे यांच्यावर सहज मात करून दुस-यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. पुढे २०१४ साली राष्ट्रवादीचे महेश गादेकर यांनी विजय देशमुख यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी देशमुख यांच्याकडून (८६ हजार ८७७ मते) गादेकर यांचा (१७ हजार ९९९ मते) दारूण पराभव झाला होता. त्यानंतर मागील २०१९ सालच्या याच विधानसभा मतदारसंघात माजी महापौर मनोहर सपाटे यांनी दिलेले आव्हानही कुचकामी ठरले.

हेही वाचा >>> ४०० रुपयांना गॅस सिलिंडर, महिलांना आर्थिक मदत, तेलंगणात बीआरएस पक्षाकडून आश्वासनांचा पाऊस!

सपाटे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार असताना निवडणूक काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा संचलनावर पुष्पवृष्टी करून पक्षाच्या विचारांशी प्रतारणा केली होती. पण त्यांना स्वतःची १९ हजार २०५ मते) अनामत रक्कमही वाचविता आली नव्हती. त्यांच्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांनी अधिक (२३ हजार ४६१) मते मिळविली होती. भाजपचे विजय देशमुख हे सलग चौथ्यांदा निवडून येताना ९६ हजार ५२९ मते घेतली होती. म्हणजेच २०१४ आणि २०१९ या दोन्ही लढतीत राष्ट्रवादीला अनामत जप्तीचा नामुष्की पत्करावी लागली होती. दरम्यान, मागील २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत तर भाजपने सत्ता मिळविताना शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आपली पकड एवढी मजबूत केली की, त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष जवळपास हद्दपार झाल्याचे दिसून आले.

जातीय समीकरणांचा विचार करता वीरशैव लिंगायत समाजासह पद्मशालीसह अन्य तेलुगु भाषक समाज, दलित-आंबेडकरी समाज, वडार, भावसार शिंपी, नामदेव शिंपी, सोमवंशीय क्षत्रीय व इतर बहुतांशी ओबीसी समाजावर भाजपची पकड दिसून येते. एवढेच नव्हे तर मराठा समाजातही भाजपचा प्रभाव वाढला आहे. ही पार्श्वभूमी पाहता या मतदारसंघात भाजपची ताकद उत्तरोत्तर वाढली असताना लिंगायत समाजाचे आसलेले आमदार विजय देशमुख यांचे वर्चस्व संपविणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. वीरशैव लिंगायत समाजात मोठा दबदबा असलेले सिध्देश्वर देवस्थान समितीसह सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना, संगमेश्वर महाविद्यालय अशी अनेक सत्तास्थाने ताब्यात असलेले धर्मराज काडादी हे आमदार विजय देशमुख यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

सिध्देश्वर साखर कारखान्याची उंच चिमणी पाडल्याच्या कारणावरून काडादी व देशमुख यांच्यातील कडवा संघर्ष सर्वांनी पाहिला आहे. दुसरीकडे भाजपंतर्गत राजकारणातही आमदार विजय देशमुख यांना वेळोवेळी शह देण्याचे प्रयत्न झाले तरी आजघडीला त्यांना थोपविणे सहज शक्य नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने हे आव्हान पेलायचे मनावर घेतल्यास त्यासाठी किमान लाखभर मतांची पेढी उभारावी लागेल. महेश कोठे हे पद्मशाली समाजाचे आहेत. परंतु त्यांना समाजाची ताकद कशी मिळेल, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. पद्मशाली समाजासह अन्य तेलुगु समाजात राष्ट्रीय स्वयंसेवकक संघाने जाळे विणून ठेवले आहे. यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) पद्मशाली समाजात चंचुप्रवेश केला आहे. त्याचा फटका नेमका कोणाला बसणार, याचे उलटसुलट गणित मांडले जाते.