मोहन अटाळकर

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये अनेक दिग्गज स्पर्धेत असताना मूळचे अमरावतीकर श्रीकांत भारतीय यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेश पातळीवरील राजकारणात आजवर पडद्याआड राहून काम करणाऱ्या भारतीय यांना त्यांच्या पक्षसंघटनात्मक बांधणीतील योगदानाचे बक्षीस मिळाले आहे. अभाविप कार्यकर्ता ते भाजपचे पडद्यामागील रणनीतीकार आणि आता विधान परिषदेतील उमेदवार असा श्रीकांत भारतीय यांचा प्रवास झाला असून पश्चिम विदर्भातील भाजप पक्षसंघटन बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

cm eknath shinde slams uddhav thackeray over 93 blasts convict campaigning for ubt sena
ठाकरे गटाकडून पाकिस्तानची हुजरेगिरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
Bharti kamdi, uddhav Thackeray shiv sena, palghar lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, Bharti kamdi development plans for palghar lok sabha, election campaign,
उमेदवारांची भूमिका : पालघर मतदार संघ, आरोग्यासाठी केलेल्या कामांचा फायदा होईल – भारती कामडी
Political controversy over Prajwal Revanna inquiry
प्रज्वल रेवण्णाच्या चौकशीवरून राजकीय वाद; भाजप सीबीआयसाठी आग्रही तर मुख्यमंत्री ‘एसआयटी’ तपासावर ठाम
Ganesh Naik, Shinde sena, thane,
गणेश नाईक-शिंदेसेनेच्या मनोमिलन मेळाव्याला मुहूर्त मिळेना
Ganesh Naik, Shinde group,
गणेश नाईकांची नाराजी दूर, पण शिंदे गटाबरोबरील मनभेद मिटतील ? नवी मुंबईतील राजकारणात विसंवादाची चर्चा
What Uddhav Thackeray Said About Modi?
उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला, “महाराष्ट्रात वखवखलेला आत्मा फिरतो आहे, कारण..”
NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’

श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. नागपूर आणि त्यानंतर मुंबई हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिले आहे. अमरावती जिल्ह्यातील मूळ रहिवासी असले, तरी त्यांचा अधिक वावर हा प्रदेश पातळीवरील राजकारणात राहिला आहे. एक अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. परतवाडा येथे शेतकरी, शिक्षक कुटुंबात जन्मलेल्या श्रीकांत भारतीय यांनी शेतकरी संघटनेत काम करताना शेतकरी आंदोलनातही सहभाग घेतला होता. प्राध्यापक, पत्रकार म्हणून त्यांनी काम केले.

१९८५ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, विदर्भाचे प्रदेश संघटनमंत्री, आसाममधल्या बोडो अल्फा चळवळींवर अभ्यासक म्हणून काम, १९९४ पासून पूर्णवेळ भाजपचे कार्यकर्ते, नागपूर शहर संघटन मंत्री, नागपूर विभाग संघटन मंत्री, २००० ते २००६ युवा मोर्चा प्रदेश संघटन मंत्री, पुणे विभाग संघटन मंत्री, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘वॉर रूम’चे प्रमुख, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समिती समन्वयक’, २०१५ ते २०१९ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी, २०२० पासून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अशी श्रीकांत भारतीय यांची कारकीर्द आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पक्षाची पकड राज्यातील ग्रामीण भागात मजबूत करण्यासाठी व्यूहनीती तयार करण्यात आली. यात श्रीकांत भारतीय यांची महत्त्वाची भूमिका होती, असे सांगितले गेले. राज्यातील नगर पंचायतींच्या निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबतही त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले. अनेक भागात कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत जवळीक वाढवली. त्यांच्या या कामाचा आणि अनुभवाचा गृहक्षेत्र असलेल्या अमरावती जिल्हा आणि पश्चिम विदर्भातही फायदा व्हावा, हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हेतू उमेदवारीमागे दिसून आला आहे.

उमा खापरे… नगरसेविका ते महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष; विधान परिषदेची अनपेक्षित उमेदवारी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना त्यांना सरकारच्या विरोधात रान उठवण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती पुरविण्याचे काम त्यांनी केले, असे सांगितले जाते.

भाजपच्या किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य देखील आहेत. आगामी निवडणुकीत‍ पश्चिम विदर्भात पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी त्यांच्या पदाचा उपयोग होईल, असे भारतीय यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.