नवी दिल्ली: काँग्रेसच्या २३ उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी जाहीर झाली असून नागपूर दक्षिण मतदारसंघ अखेर काँग्रेसला मिळाला आहे. या जागेवरून काँग्रेस व शिवसेना-ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू होती. काँग्रेसने इथे गिरीश पांडव यांना संधी दिली आहे.

काँग्रेसने पहिल्या यादीमध्ये ४८ उमेदवार घोषित केले होते. आत्तापर्यंत काँग्रेसने ७१ उमेदवार जाहीर केले आहेत. श्रीरामपूरमध्ये विद्यामान आमदार लहू कानडे यांना पुन्हा उमेदवारी न देता हेमंत ओगले यांच्या रूपात नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. कामठीमधून भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जळगाव (जामोद)मधून स्वाती विटेकर, भंडारामधून पूजा ठावकर तर सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या यादीत तीन महिला उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : सोलापुरात जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, जिल्ह्यातील चार मतदारसंघांत संघर्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरोळ मतदारसंघामधून गणपतराव पाटील यांनी संधी दिली आहे. या मतदारसंघातून सतेज पाटील लढण्यास उत्सुक होते. जालनामधून विद्यामान आमदार कैलास गोरंट्याल यांचा अखेर दुसऱ्या यादीत समावेश करण्यात आला आहे. संभाजीनगर-पूर्वमधून मधुकर देशमुख, निलंगामधून अभयकुमार साळुंखे, आर्णीमधून जितेंद्र मोघे, वसईमधून विजय पाटील, कांदिवली पूर्वमधून काळू बधेलिया, तारकोपमधून यशंवत सिंह, सायन-कोळीवाडामधून गणेश यादव यांना उमेदवारी मिळाली आहे.