निवडणूक आयोगाने (EC) लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विशेष म्हणजे त्याच्या अवघ्या दोन आठवड्यांनंतर अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या १० जागा भाजपाने जिंकल्या आहेत, ज्यात मुख्यमंत्री पेमा खांडू यांचाही समावेश आहे. खरं तर खांडू हे २०१४ आणि २०११ मध्ये बिनविरोध विजयी झाले होते. ६० सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेतील १० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. २०१४ मधील निवडणुकीतही असाच विक्रम झाला होता. तेव्हाही ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. लोकसभा खासदारांपेक्षा आमदार बिनविरोध विजयी होणे ही सामान्य बाब आहे. १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत २९८ आमदार आणि २८ खासदारांनी एकही विरोधक नसताना जागा जिंकल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा

विधानसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यात नागालँड राज्य आघाडीवर आहे आणि इथून सर्वाधिक ७७ आमदार बिनविरोध निवडून आले आहेत, त्यानंतर जम्मू आणि काश्मीर ६३ आमदार आणि अरुणाचल प्रदेश ४० आमदार बिनविरोध निवडून आले आहेत. १९६२ मध्ये आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, म्हैसूर आणि जम्मू-काश्मीरमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक ४७ आमदार विधानसभेवर बिनविरोध निवडून गेले होते. त्यानंतर १९९८ मध्ये ४५ आमदार, १९६७ आणि १९७२ मध्ये प्रत्येकी ३३ आमदार बिनविरोध निवडून गेले होते. काँग्रेसचे आतापर्यंत १९४ आमदार बिनविरोध निवडून आले आहेत, त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) ३४ आणि भाजपाच्या १५ आमदारांचा समावेश आहे. आतापर्यंत २९ अपक्ष आमदारही बिनविरोध निवडून आले आहेत.

हेही वाचाः पस्तीस वर्षात ‘धनुष्यबाण’ चिन्हाशिवाय बालेकिल्ल्यातील शिवसेनेची पहिलीच निवडणूक

खांडू आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री सय्यद मीर कासिम प्रत्येकी तीन वेळा विक्रमी मताधिक्क्यानं बिनविरोध निवडून आले आहेत. खांडू यांच्या मुक्तो विधानसभेच्या जागेवरून सर्वाधिक पाच आमदार बिनविरोध निवडून आल्याची उदाहरणे आहेत. खांडू यांच्या आधी त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांनी १९९० आणि २००९ मध्ये बिनविरोध जागा जिंकली होती.

हेही वाचाः ईडी, सीबीआय अन् प्राप्तिकर विभागाची कारवाई निवडणुकीचा खेळ बिघडवणार? माजी निवडणूक आयुक्त म्हणाले…

लोकसभा

१९५२ पासून जम्मू आणि काश्मीरमधून सर्वाधिक चार खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांसह केवळ आठ राज्यांनी एकापेक्षा जास्त खासदारांना बिनविरोध निवडून संसदेत पाठवले आहे. १९५२, १९५७ आणि १९६७ मधील निवडणुकीत सर्वाधिक प्रत्येकी पाच खासदार निवडून आले होते. खरं तर सर्वात अलीकडची २०१२ ची पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. तेव्हा समाजवादी पार्टी (SP) अध्यक्ष अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिंकले होते. त्याआधी १९९५ मध्ये खासदार बिनविरोध विजयी झाले होते. काँग्रेसचे सर्वाधिक २० खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स आणि सपाचे प्रत्येकी दोन खासदार निवडून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत फक्त एक अपक्ष बिनविरोध विजयी झाला आहे. या यादीत भाजपाचा एकही उमेदवार नाही. लोकसभेच्या सिक्कीम आणि श्रीनगर या फक्त दोन जागांवर एकापेक्षा जास्त वेळा खासदार बिनविरोध निवडून आले आहेत.

बिनविरोध निवडून आलेल्या उल्लेखनीय खासदारांमध्ये नाशिकचे रहिवासी असलेले माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा समावेश आहे. श्रीनगरमधून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला, नागालँडचे माजी मुख्यमंत्री आणि चार राज्यांचे माजी राज्यपाल एस सी जमीर, अंगुल येथील ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्ण महाताब, तामिळनाडूतील तिरुचेंदूर येथील संविधान सभेचे माजी सदस्य टी. टी. कृष्णमाचारी आणि लक्षद्वीपचे माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा के एल राव हेसुद्धा बिनविरोध खासदार म्हणून निवडून आले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of mlas and mps without election battle vrd
First published on: 01-04-2024 at 14:41 IST