सुपरस्टार विजय तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. आता तमिळ सिनेसृष्टीतील हा अभिनेता राजकारणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अभिनेता विजय नवी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षाची नोंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, पक्षाची नोंदणीप्रक्रिया जवळ आली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याऐवजी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत विजयच्या संभाव्य पदार्पणाची तयारी सुरू आहे. अभिनेत्याचा सामाजिक कल्याणकारी कार्यांमध्ये अग्रेसर असणारा ‘विजय मक्कल इयक्कम’ या प्रसिद्ध चाहत्या गटाचेच संपूर्ण राजकीय पक्षात रूपांतर केले जात आहे. अभिनेत्याच्या जवळच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, केरळ आणि कर्नाटकमध्ये त्याचा मजबूत आणि संघटित चाहता वर्ग पाहता पक्षाची पोहोच तामिळनाडूच्या पलीकडे वाढण्याचीही अपेक्षा आहे.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश

पक्षाची स्थापना याक्षणी तयारीच्या टप्प्यात असल्याचे आंतरिक सूत्रांनी सांगितले. “आता अनेक प्रशासकीय कामे सुरू आहेत. १०० हून अधिक लोकांकडून आधार कार्ड, मतदार ओळखपत्रे आणि शपथपत्रे गोळा करून ते इतर कोणत्याही राजकीय संघटनांशी संबंधित नसल्याचा पुरावा म्हणून पुढील आठवड्यात दिल्लीतील निवडणूक आयोगाकडे सादर केले जातील,” असे अभिनेत्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले.

तमिळ चित्रपट उद्योगात विजय याला त्याच्या चाहत्यांकडून थलपथी (कमांडर) म्हणून ओळखले जाते. त्याला तमिळ चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या बाबतीत रजनीकांतनंतर दुसऱ्या क्रमांकावर मानले जाते. बऱ्याच काळापासून एक संवेदनशील आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्याची ओळख आहे. ऑनस्क्रीन ॲक्शन-हिरोच्या त्याच्या व्यक्तिरेखेला भरभरून पसंती दिली जाते. राजकारणात त्याचा प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. हा प्रवेश त्याच्या कारकिर्दीतील एक नवीन अध्याय असेल. विजय तामिळनाडूमधील अभिनेते-राजकारणींच्या लांबलचक यादीत सामील होईल, ज्यात एमजीआर, शिवाजी गणेशन, जयललिता, दिवंगत कॅप्टन विजयकांत आणि कमल हसन या नावाने प्रसिद्ध एम. जी. रामचंद्रन यांचा समावेश आहे.

४९ वर्षीय अभिनेता राज्यातील सरासरी राजकारण्यांपेक्षा तरुण आहे. द्रमुकच्या उदयनिधी स्टॅलिन (४६) आणि राज्य भाजपा अध्यक्ष के. अन्नामलाई (३८) या तरुण राजकारण्यांच्या गटात त्याचे नाव सामील होईल. या गटात, चित्रपट दिग्दर्शक-आक्रमक तमिळ राष्ट्रवादी सीमन नाम तमिलार काची हे ५७ वर्षीय नेते आहेत, जे सर्वात ज्येष्ठ आहेत.

विजयच्या राजकारणातील प्रवेशामागे कारण काय?

विजयचा राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय नेहमीच त्याचे महत्त्वाकांक्षी वडील आणि चित्रपट दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर यांच्याशी जोडला गेला. त्याचे राजकारणात येण्याचे संकेत गेल्या जूनमध्येच त्याने दिले. तो चेन्नईमध्ये एका विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात सहभागी झाला असतांना तेथील विद्यार्थ्यांना त्याने मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना राजकारण्यांकडून मतांसाठी पैसे न घेण्यास सांगावे असे त्याने सांगितले. यासह बीआर आंबेडकर, पेरियार ईव्ही रामास्वामी आणि के. कामराज यांसारख्या नेत्यांबद्दल स्वतःला शिक्षित करण्यास सांगितले, ज्यामुळे या विषयावर व्यापक चर्चा सुरू झाली.

तो तरुण आहे आणि एमजीआर, रजनीकांत आणि कमल हसन यांच्यापेक्षाही जास्त लोकप्रिय आहे हे लक्षात घेता, शीर्ष राजकारणी त्याच्या राजकीय प्रवेशाबद्दलच्या अफवांना उत्तर देणे टाळत असल्याचे समोर आले. तर दुसरीकडे द्रविड मुन्नेत्र कळघम नेते इडाप्पाडी पलानीस्वामी, उदयनिधी ते अन्नामलाई या नेत्यांनी त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्याच्या राजकारणात विजयच्या प्रवेशाची अपेक्षाही सीमनला असल्याचे त्यांनी सांगितले.

रजनीकांतचा बहुचर्चित राजकीय प्रवेश तीन वर्षांपूर्वी त्यांनी स्वत: रद्द केला होता. रजनीकांतच्या तुलनेत विजयचा चाहता वर्ग विविध वयोगटातील असल्यामुळे, हे त्याच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. रजनीकांत यांच्या तुलनेत मजबूत तमिळ अशी विजयची ओळखही त्याला फायद्याची ठरेल. रजनीकांत यांचा राजकीय प्रवेश मराठीमुळे तसेच भाजपा आणि आरएसएस सोबतच्या संघटनांमुळे द्रविडीयन राजकारणाचे वर्चस्व असलेल्या राज्यात वादाचा मुद्दा बनला होता. तसे विजयच्या बाबतीत घडणार नाही.

हेही वाचा : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन फरार? सोरेन यांच्या निवासस्थानी ईडीची धाड; रांचीमध्ये जमले झारखंडचे मंत्रिमंडळ

अनेक वर्षांपासून रजनीकांतच्या अनुयायांप्रमाणे, विजयच्या चाहत्यांवरही त्याच्या राजकीय प्रवेशाबद्दल अफवा पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोठ्या बजेटच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अभिनेत्याचे बाजारमूल्य वाढवण्यासाठी हा प्रचार केला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ‘लिओ’ हा विजयचा शेवटचा चित्रपट होता आणि वेंकट प्रभू दिग्दर्शित ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ हा त्याचा पुढील रीलिज होणारा चित्रपट आहे. २०१७ मध्ये, विजयने त्याच्या ‘मेर्सल’ चित्रपटात जीएसटीबद्दलच्या संवादांनी भाजपाची पिसे फोडली. राहुल गांधी आणि पी. चिदंबरम यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी भाजपावर टीका केल्याने राजकीय वादाला सुरुवात झाली होती.