दीपक महाले

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात घोषणांचा पाऊसच पाडला. परंतु, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील ठाकरे गटाने मांडलेल्या कापूस भाववाढीच्या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चकार शब्दही काढला नाही.

भोकर जि. जळगाव येथे मुख्यमंत्री शिंदे हे विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना व भाजपचे आमदार, खासदार आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांची उपस्थिती होती.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे यांच्यापुढे आता पर्याय कोणते?

राज्यभरात कापसाच्या भाववाढीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यावरून आंदोलने होत आहेत. शेतमालाचे भाव पडत असल्याने शेतकर्‍यांमध्ये राज्य शासनाविषयी रोष आहे. कापूस भाववाढीविषयी शेतकऱ्याय्ध्ये असेलली तीव्र भावना हेरत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाने कापसाच्या भावाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यासपीठावरुन केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भाषणात कापसाच्या भावाबद्दल मौन पाळले. त्यामुळे कापूस उत्पादकांची निराशा झाली. गतवर्षी कापसाला प्रतिक्विंटल १२ हजार रुपये भाव होता. यंदा किमान प्रतिक्विंटल १० हजार रुपये भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी कापूस घरातच ठेवला. आता कापसाचे भाव साडेसात हजारांपर्यंत आले आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : “आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आली आहे की…”, संजय राऊतांचा हल्लाबोल, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

घरातच कापूस पडून असल्याने त्याची प्रतवारी घसरु लागली आहे. जिल्ह्यात सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. त्याअनुषंगाने पालकमंत्री पाटील यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ-उतार होत असल्याने भाव कमी होत असल्याचा दावा केला. शासनाने कापसाच्या भावाकडे लक्ष द्यावे. मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात कापूस दरवाढीबाबत बोलतील, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणात नेहमीप्रमाणे रोखठोक भूमिका न मांडता शेतकर्‍यांना सुखी करण्यासाठी जे जे करता येईल, ते करू, असे म्हणत वेळ निभावून नेण्याचे काम केले. केळीपासून विविध उत्पादने तयार करणार्‍या कंपनीला उद्योग विभागामार्फत बाराशे कोटींचे प्रोत्साहन देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा केली. याआधीही त्यांनी ही घोषणा केली आहे. केळीचा पोषण आहारात समावेश करण्याचेही आश्‍वासन दिले.

हेही वाचा >>> भाजपची काँग्रेस होईल ही भीती फडणवीस यांना का वाटते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहमीप्रमाणे शिंदे गटाच्या आणि भाजपच्या सर्व मंत्र्यांनी, आमदारांनी उध्दव ठाकरेंना लक्ष्य केले. व्यासपीठावर ठाकरे गटावर एकेकाकडून टिकास्त्र सोडण्याचे काम सुरु असताना दुसरीकडे, मुख्यमंत्री शिंदे यांनी कापूस, केळीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी निवेदन देण्यासाठी सभास्थानी येणाऱ्या ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नाही, असे सांगत त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्यामुळे राज्य सरकारविरोधात त्यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात आली.