सुहास सरदेशमुख

‘हाफकिन’च्या अज्ञानवादातून कशीबशी सुटका झाल्यानंतर मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मराठवाड्यातील शिंदे गटातील तिन्ही मंत्री वादाच्या रिंगणात सापडले आहेत.

हेही वाचा >>> गेहलोत यांच्या अप्रत्यक्ष ‘बंडा’मुळे गांधी कुटुंब अडचणीत

मंत्री होण्यापूर्वी ‘ टीईटी’ घोटाळयात अब्दुल सत्तार यांचे नाव समोर आले. न्यायालयाने जमीन प्रकरणी फटकारले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न झालेल्या निर्णयाची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविल्याने त्यांना झापले. रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट जावयाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्या आरोपाचा वाद निर्माण होण्यापूर्वी गर्दी जमविण्यासाठी शासकीय यंत्रणेचा भुमरे यांनी दुरूपयोग केला.

हेही वाचा >>> राज्यातील सत्ता संघर्षाबाबत घटनापीठापुढे उद्या सुनावणी

अंगणवाडी कार्यकर्ती व पर्यवेक्षकांनी सभेला उपस्थित रहावे असे लेखी आदेशच काढण्यात आले होते. त्यामुळेही वाद निर्माण झाला होता. आता तानाजी सावंत यांच्या भोवतीही बेताल वक्तव्याचा वाद उभा राहिला आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बोलताना उस्मानाबाद येथे केलेल्या वक्तव्यामुळे सावंत यांनी माफी मागितली आहे. मराठवाड्यातील तिन्ही मंत्र्यांभोवती अशाप्रकारे वादाचे रिंगण पडल्याचे चित्र दिसून येत आहे.