तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवले आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे तेलंगाणा राष्ट्र समिती हे नाव बदलले असून पक्षाला भारत राष्ट्र समिती असे नवे नाव दिले आहे. दरम्यान, बी विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीचे शिष्टमंडळ लवकरच निवडणूक आयोगाला भेटणार असून पक्षाच्या बदललेल्या नावाची नोंद घेण्याची विनंती केली जाणार आहे. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या संविधानातही बदल केला जाणार आहे. दरम्यान, केसीआर यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलल्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजपाकडून सडकून टीका केली जात आहे.

हेही वाचा >> ‘भारत जोडो’ यात्रेत सोनिया गांधीही सहभागी; राहुल गांधीसोबत केली पदयात्रा

के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी टीआरएसच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत जनता दल (सेक्यूसर) पक्षाचे नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे २० आमदारही या बैठकीला उपस्थित होते. तामिळनाडूतील विदुथलाई चिरूथाईगल काटची पक्षाचे नेते थिरुमावालावन हेदेखील त्यांच्या पक्षातील अन्य नेत्यांसह या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत २००१ साली स्थापन झालेल्या टीआरएस या राज्य पातळीवरील पक्षाचे राष्ट्रीय पक्षात रुपांतर करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बैठकीआधी चंद्रशेखर राव यांनी कुमारस्वामी आणि थिरुमावालावन यांच्यासोबत चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार भारत राष्ट्र समिती आणि जनता दल (सेक्यूलर) पक्ष कर्नाटकमधील निवडणूक एकत्र लढवणार आहेत.

अपहरण, हत्या अन् फळबागेत मृतदेह; अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ, जाणून घ्या काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, के चंद्रशेखर राव यांनी पक्षाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेस आणि भाजपाने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. तेलंगाणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए रेवंथ रेड्डी यांनी केसीआर यांच्या पक्षात तेलंगाणा नाव होते. या नावामुळे तो पक्ष तेलंगाणा राज्यातील लोकांचे प्रतिनिधीत्व करायचा असे वाटायचे. तेलंगाणा ही ओळख आहे. या नावाशी लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत. पक्षाच्या नावातून तेलंगाणा हा शब्द काढून चंद्रशेखर राव यांनी या भावनांचा अनादर केला आहे. पक्षाचे तेलंगाणाशी असलेले नाते त्यांनी तोडले आहे, अशी टीका केली. भाजपानेही केसीआर यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत अनेक पक्षांनी आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी पक्षाचे नाव बदलले आहे. या प्रयत्नात अनेकांना अपयश आलेले आहे. केसीआर यांनी पक्षाचे नाव बदलल्यामुळे त्यांच्या हातातून राज्य निसटेल, असा दावा तेलंगाणामधील भाजपाचे मुख्य प्रवक्ते के कृष्णा सागर राव यांनी केला.