संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईतूनच बुधवारी दोन्ही गटांच्या मुंबई व नवी दिल्लीत झालेल्या मेळाव्यांमध्ये अन्य राज्यांमधील प्रदेश प्रमुखांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी वेगवेगळे प्रदेश प्रमुखांना स्थान दिले होते.

हेही वाचा… शिवसेनेसाठी आर पारची लढाई….

शिवसेनेच्या गोरेगावमध्ये झालेल्या गट प्रमुखांच्या मेळाव्याच्या अखेरीस विविध राज्यांमधील पक्ष प्रमुखांना व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आले. गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार , तेलंगणा आदी राज्यांच्या प्रदेश प्रमुखांची नावे वाचण्यात आली. त्यानुसार हे प्रमुख व्यासपीठावर आले. त्यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर छायाचित्र काढण्यात आले. दुसरीकडे शिंदे गटाचा नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मेळावा झाला. हा मेळावा अन्य राज्यांमधील पक्ष प्रमुखांचा होता. या मेळाव्यात महाराष्ट्राबाहेरील पक्ष प्रमुखांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. शिंदे गटाने शिवसेनेच्या राज्य प्रमुखांचा मेळावा घेतल्यानेच ठाकरे गटाने गोरेगावच्या मेळाव्यात बाहेरच्या राज्यांमधील पक्ष प्रमुखांना निमंत्रित केले होते.

हेही वाचा… दसरा मेळाव्यातील शक्ती प्रदर्शनाची जबाबदारी बंडखोरांच्या शिरावर

शिवसेनेत सध्या ठाकरे आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरू आहे. खरी शिवसेना कोणती हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात तसेच निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. पुढील मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठासमोर शिवसेनेच्या विविध याचिकांवर सुनावणी सुरू होईल. आम्हालाच अधिक समर्खन आहे हे दाखविण्याचा दोन्ही गटांचा प्रयत्न आहे. केवळ विधिमंडळ पक्षात दोन तृतीयांश फूट पडून चालत नाही तर संघटनेतही फूट पडली आहे शिंदे गटाला सिद्ध करावे लागेल. या दृष्टीने शिंदे गटाने विविध राज्यांमधील प्रमुख आपल्याबरोबर आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटानेही विविध राज्यांमधील पक्ष प्रमुख आपल्या बरोबर आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray and eknath shinde share stage with shiv sena others state leaders print politics news asj
First published on: 22-09-2022 at 13:27 IST