scorecardresearch

ओमर अब्दुला: ३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मीरचा प्रश्न सुटला नाही

ओमर अब्दुल्ला यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली आहे.

Omer Abdulaha

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली आहे. या मुलाखतीत त्यांनी सांगितले की “काश्मिरी पंडित आणि बाहेरील लोकांवर सध्या होत असलेल्या हल्यांवरून असे दिसून येते की कलम ३७० हे दहशतवाद आणि हिंसाचाराचे मूळ कारण नव्हते”. या आणि अन्य विषयांवर त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’सोबत संवाद साधला.

केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती हातळण्याबद्दल तुमचे मत काय आहे ? 

३७० कलम हे मूलतः दहशतवाद, हिंसाचार, फुटीरतावाद इत्यादींचे मूळ कारण होते असा दावा ५ ऑगस्ट २०१९ नंतर लगेचच करण्यात आला. या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळण्यासाठी ३७० कलम रद्द करणे गरजेचे असल्याचा दावा करण्यात आला. मात्र अजूनही तो प्रश्न सुटलेला नाही. आजही या भागात दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार हे एक वास्तव आहे आणि त्याविरोधात आजही आपण संघर्ष करत आहोत.

अजूनही सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी आहेत याचे तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का?

मला या गोष्टींचे आश्चर्य वाटत नाही. कारण कलम ३७० रद्द करणे हे या सगळ्यांचे मूळ कारण नव्हते हे मला माहित होते. कलम ३७० हा संविधानाचा एक भाग होता. जे लोक यामध्ये सहभागी होते त्यांचा संविधानावर विश्वास नाही. माझ्या मते जोपर्यंत तुम्हाला खात्री नसते की तुम्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम आहात तोपर्यंत त्या गोष्टी करु नयेत. सध्या या भागात चिंताजनक परिस्थिती आहे.

“जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येकडे जास्त लक्ष वेधून घेता तेव्हा तुम्ही हल्ल्यांना प्रोत्साहन देता” असे विधान तुम्ही यापूर्वी केले होते. अजूनही तुमचे हेच मत आहे का?

प्रत्येकाचे वैयक्तिकरित्या संरक्षण करणे अशक्य आहे. हे असे हल्ले पहिल्यांदाच घडत आहेत असे नाही. मात्र सातत्याने ह्या घटना घडत आहेत हे चिंताजनक आहे. गेल्या वर्षी आम्हाला खूप मोठी झळ बसली होती. मात्र सरकारला विश्वास वाटतोय की गेल्या वर्षी ज्या पद्धतीने हा विषय संपला होता त्याच प्रमाणे यावर्षीही होईल. पण काश्मीरमध्ये अशा प्रकारे एखादी गोष्ट गृहीत धरणे धोकादायक आहे. लोकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात भाजपाने आणि केंद्र सरकारने अनेक अडचणी वाढवल्या आहेत.

अलीकडच्या काळात झालेल्या हल्यांमध्ये शिक्षक, एक बँक कर्मचारी, एक कलाकार हिंसाचाराला बळी पडले आहेत. या गोष्टी तुम्हाला चिंतेत टाकत आहेत का?

हो. हे खूपच चिंताजनक आहे. त्यांनी निःशस्त्र लोकांवर हल्ला केला आहे. त्यामध्ये लहान मुलांना देखील इजा झाली. यामध्ये त्यांना थोडीही लाज वाटत नाही. हे वास्तव आपल्यासाठी स्वीकार करण्यासारखे नक्कीच नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2022 at 14:56 IST
ताज्या बातम्या