पाकिस्तानविरुद्ध निर्णायक क्षणी सोपा झेल सोडणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सोशल मीडियावर फारच मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. राज्यसभेचे खासदार हरभजन सिंग यांच्यासह पंजाबचे अनेक नेते अर्शदीपची पाठराखण करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.सिंग यांना सोमवारी पंजाबमधील राजकारण्यांचा पाठिंबा मिळाला, आम आदमी पार्टी (आप), काँग्रेस, भाजप आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) मधील अनेक नेत्यांनी आणि अगदी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या २३ वर्षीय तरुण क्रिकेटपटूला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपचे चे राज्यसभा खासदार हरभजन सिंग, भारताचे माजी क्रिकेट स्टार, अर्शदीपच्या समर्थनार्थ समोर आले, त्यांनी नेटकऱ्यांना खडे बोल सुनावले आहे.. अशदिपवर टीका करणे थांबवा. कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही..आम्हाला आमच्या मुलांचा अभिमान आहे.. पाकिस्तानने चांगला खेळ केला.. लाज वाटते अशा लोकांना जे या व्यासपीठावर अर्श आणि संघाबाबत टीका करून त्यांचं खाच्चिकरण करतात. अर्श हे सुवर्ण आहे. अश्या शब्दात त्यांनी ट्रोलराला सुनावले आहे.कॅबिनेट मंत्री हरपाल चीमा यांनीही या क्रिकेटपटूचे समर्थन करत ट्विट केले की, “ सामन्यात चुका नेहमीच घडतात. शेवटी आपण सर्व मनुष्यच आहोत. आमच्या युवा खेळाडू अर्शदीप वर टीका करण्याचा किंवा प्रश्न करण्याचा अधिकार कोणालाही नाही. 

राज्याचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री गुरमीत सिंग मीत हेयर म्हणाले की, अर्शदीप हा चांगला खेळाडू आहे. आणि येणाऱ्या काळात त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. दुबईत असलेल्या क्रिकेटपटूची आई बलजीत कौर यांच्याशीही त्यांनी फोनवर संपर्क साधून संपूर्ण देश आपल्या मुलाच्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की संघ भारतात परतल्यावर अर्शदीपचे वैयक्तिकरित्या स्वागत केलं जाईल.

त्यांनी ट्विट करत अर्शदीपला आपला पाठिंबा दर्शवला आहे. “विजय किंवा पराभव खेळाचा भाग आहे. अर्षदीप हा भराचा भविष्य आहे.ज्याने अल्पावधीत आपले स्थान निर्माण केले आहे. पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. फक्त एक झेल सोडल्यावर त्याला ट्रोल करणं योग्य नाही. अर्शदीप हे राष्ट्राचे भविष्य आहे. तरुणांसाठी प्रेरणा आहे.द्वेषाला खेळात स्थान नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young bowler arshdeep who was trolled by netizens is supported by all the politicians in punjab pkd
First published on: 07-09-2022 at 01:25 IST