राम भाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाच्या २१ व्या वर्षी प्रवीण दटके यांनी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. २००४ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी ते महाल प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. प्रवीण दटके यांच्या नागपूर शहरातील भाजपचे युवा नेतृत्व म्हणून पाहिले जाते. १६ डिसेंबर १९७८ ला जन्मलेले प्रवीण दटके यांना वडील प्रभाकरराव दटके यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, नागपूर महापालिकेचे नगरसेवक आणि महापौर, महाराष्ट्र प्रदेशचे राज्य सरचिटणीस ही पदे त्यांनी भूषविली. प्रवीण दटके यांचे प्रारंभिक शिक्षण महालातील नवयुग माध्यमिक विद्यालयात झाले. दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. नागपूरचे महापौर म्हणून त्यांनी काम बघितले. तत्पूर्वी २०१० ते २०१६ या काळात प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१७ मध्ये ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले. त्यानंतर २०२० मध्ये भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहराचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. आजही ते शहर अध्यक्ष आहेत.

हेही वाचा: महेश शिंदे : विकासकामांची दूरदृष्टी

२०२० मध्ये विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून आले. २०१४ ते २०१६ या काळात ते शहराचे महापौर होते. २०१७ ते २०२२ या काळात शिक्षक सहकारी बँकेचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. मे २०२० मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले. व्यवसायाने शेतकरी असलेले प्रवीण दटके म्हणतात, सामान्य माणसाला हवी असलेली मदत करणे हेच खरे राजकीय नेत्यांचे काम आहे. केवळ राजकारण नाही तर त्यातून समाजकारण करत उपेक्षितांची सेवा करणे हा उद्देश ठेवत काम सुरू आहे.

हेही वाचा: अमित सामंत : वचनपूर्तीसाठी धडपड

राजकारणी लोकांची सामान्य माणसांसाठी काम करण्याची इच्छाशक्ती हवी. राजकारणात महत्त्वाकांक्षा ठेवून आजपर्यंत कधीच काम केले नाही. वडिलांच्या निधनानंतर कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत गेलो. त्यामुळे पक्षाने अनेक पदांवर काम करण्याची संधी दिली. महत्त्वाकांक्षा ठेवण्यापेक्षा सतत काम करत राहणे, सामान्य माणसांच्या समस्या सोडविणे आणि त्यांच्यासाठी आपली उपलब्धता असणे हेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पक्षाने आपल्याला काय दिले यापेक्षा पक्षाला आणि समाजाला आपण काय देऊ शकतो हा विचार ठेवून काम करतो आहे आणि पुढे पद नसले तरी काम करत राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young politician corporator praveen datke is a young worker of bjp nagpur print politics news tmb 01
First published on: 22-11-2022 at 10:25 IST