पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार १०१ नवे करोनाबाधित आढळले, तर १७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. करोनाबाधितांची संख्या ६० हजार ५९७ वर पोहचले आहे.
आजअखेर १ हजार ४२९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. करोनावर उपचार घेणार्या १ हजार १५९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजअखेर ४२ हजार ४१० रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५ हजार पार झाली आहे. आज दिवसभरात ७९८ करोनाबाधित रुग्ण आढळले असून १६जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आज ३०१ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या २५ हजार १०६ वर पोहचली असून पैकी, १७ हजार ४०७ जण करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील ५२१ जणांचा मृत्यू झाला आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ९७० आहे. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात १० हजार ३०९ नवे करोनाबाधित आढळून आले व ३३४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. तर, दिलासादायक बाब म्हणजे ६ हजार १६५ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ६८ हजार २६५ वर पोहोचली आहे. यामध्ये १ लाख ४५ हजार ९६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ६८ हजार २६५ वर पोहचली आहे. यामध्ये १ लाख ४५ हजार ९६१ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले ३ लाख ५ हजार ५२१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १६ हजार ४७६ जणांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.