24 January 2021

News Flash

‘यूपीएससी’त राज्यातील १०० उमेदवारांची निवड

राज्यातील शंभर उमेदवार निवडले गेले असले तरी त्यातील पाच-सातजणच पहिल्या शंभरात आहेत.

टीना दाबी, योगेश कुंभेजकर 

दिल्लीतील टीना दाबी देशात; तर सोलापूरचा योगेश कुंभेजकर महाराष्ट्रात प्रथम

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१५मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून दिल्लीच्या टीना दाबी हिने त्यात बाजी मारली. सोलापूर येथील योगेश कुंभेजकर राज्यात पहिला आला. देशात तो ८व्या स्थानावर आहे. गेल्या पंचवीस वर्षांत राज्याच्या उमेदवाराला मिळालेली ही सर्वोच्च श्रेणी आहे.

राज्यातील शंभर उमेदवार निवडले गेले असले तरी त्यातील पाच-सातजणच पहिल्या शंभरात आहेत.

जम्मू-काश्मीरचा अथर अली उल शफी खान याने दुसरा तर दिल्लीचा जसमित सिंग संधू याने तिसरा क्रमांक पटकावला.  लातूरचा श्रीकृष्ण पांचाळ राज्यात दुसऱ्या तर देशात सोळाव्या स्थानावर आहे. प्रशासकीय सेवा, विदेश सेवा, पोलीस सेवा आणि केंद्रातील अ आणि ब दर्जाच्या सेवांसाठी ही परीक्षा झाली. या परीक्षेतून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमधून १८० उमेदवारांची प्रशासकीय सेवेसाठी, ४५ उमेदवारांची विदेश सेवेसाठी, १५० उमेदवारांची पोलिस सेवेसाठी नियुक्ती होणार आहे. निकाल आयोगाच्या ६६६.४स्र्२ू.ॠ५.्रल्ल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. – अधिक वृत्त २महाराष्ट्राचे सर्वोत्तम यश

यूपीएससीच्या परीक्षेत राज्याचा निकाल गेली अनेक वर्षे वाढत असला, तरीही गेल्या पंचवीस वर्षांत देशात पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारे अवघे दोन उमेदवार आहेत. या वर्षी योगेश कुंभेजकर याला देशात आठवी श्रेणी मिळाली आहे. गेल्या साधारण पंचवीस वर्षांतील ही महाराष्ट्रातील उमेदवाराला मिळालेली सर्वोच्च श्रेणी आहे. यापूर्वी २०१२ मध्ये पुण्यातील अमृतेश औरंगाबादकर देशात दहावा आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 8:15 am

Web Title: 100 student selected in upsc exam from maharashtra
टॅग Upsc Exam
Next Stories
1 जळताना जिवाच्या आकांताने तो ओरडत राहिला पण जमाव चित्रीकरणातच मग्न होता..
2 सोप्या भाषेतून गुंतवणुकीचे मर्म उलगडले
3 सेझसाठी सक्तीचे भूसंपादन नाही
Just Now!
X