पिंपरी : वेगवेगळी कारणे पुढे करून मतदानाविषयी अनास्था दाखवणाऱ्या वर्गाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम चिंचवड येथील एका वयोवृद्ध नागरिकाने केले आहे. वयाची शंभरी ओलांडलेल्या या नागरिकाने मोठय़ा उत्साहात मतदान करतानाच इतरांनाही मतदानाचे आवाहन केले.

अण्णा अलंकार (रा. मोहननगर, चिंचवड) असे त्यांचे नाव आहे. ते दूध व्यावसायिक आहेत. चिंचवडच्या मोहननगर भागात ते राहतात. ते नियमितपणे वर्तमानपत्रांचे वाचन करतात. त्यांचे राजकीय ज्ञान उत्तम असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथील चोपडा महाविद्यालयात त्यांचे मतदान केंद्र होते. सकाळी अकरा वाजता त्यांनी नातवाबरोबर येऊन मतदान केले. न चुकता प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी इतरांनाही केले.