News Flash

चिंताजनक : पुण्यात दिवसभरात करोनामुळे 11 मृत्यू, 106 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

करोनाबाधितांची एकूण संख्या 5 हजार 533 वर पोहचली

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमधील रुग्ण संख्येबरोबरच करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. आज दिवसभरात पुण्यात करोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. तर 106 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 5 हजार 533 झाली आहे. तर आजपर्यंत करोनामुळे 284 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच उपचार घेतलेल्या असलेल्या 184 रुग्णांची आज पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर एकूण 3 हजार 59 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पुणे विभागात करोना विषाणूंचे रुग्ण वाढत असून, आज पुणे विभागात 403 करोना रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत 8 हजार 122 इतकी एकूण रुग्ण संख्या झाली आहे. तर एकुण 377 रुग्णांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, याच दरम्यान 3 हजार 841 इतके रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 26 नवे रुग्ण-

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 26 करोना बाधित रुग्ण आढळले असून, यात शहरा बाहेरील चार रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या 446 वर पोहचली आहे. तर आज 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत शहरातील 191 जणांना तर शहराबाहेरील 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आज बाधित आढळलेले रुग्ण हे च-होली, भाटनगर, किवळे, निगडी, पिंपळे गुरव, सांगवी आनंदनगर चिंचवड, बौध्दनगर, काळेवाडी फाटा, बोपखेल, आंबेगांव येथील रहिवासी आहेत. तर डिस्चार्ज देण्यात आलेले करोनामुक्त हे किवळे, संभाजीनगर, रुपीनगर, आनंदनगर चिंचवड, रहाटणी, चिखली, कसबापेठ, बोपोडी येथील रहिवासी आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 9:04 pm

Web Title: 11 deaths due to corona in pune today 106 new positive patients msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणे विभागात आज 403 नवे करोनाबाधित, एकूण रुग्ण संख्या 8 हजार 122 वर
2 इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा, रद्द झालेल्या पेपरचे ‘इतके’ गुण मिळणार
3 पिंपरी-चिंचवडमध्ये दोन महिन्यानंतर सलून सुरू; दरवाढ होण्याची शक्यता
Just Now!
X