News Flash

पिंपरी : गॅलरीमधून तोल जाऊन १२ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू 

लहान भावासोबत गॅलरीमध्ये खेळत होता

पिंपरी-चिंचवडमध्ये सातव्या मजल्याच्या गॅलरीमधून खाली पडल्याने १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. अथर्व दीपक गावडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही दुःखत घटना दुपारी चार वाचण्याच्या सुमारास पिंपरीमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील कोहिनुर या इमारतीच्या सातव्या मजल्यावर गावडे कुटुंब राहातं. मयत अथर्व आणि त्याचा लहान भाऊ हे दोघे गॅलरीमध्ये खेळत होते. तेव्हा, त्यांची आई घरकामात व्यस्त होती. दरम्यान, अथर्व गॅलरीवर चढला आणि तिथून खाली डोकावत होता. त्याचवेळी तोल जाऊन तो थेट सातव्या मजल्याच्या गॅलरीमधून खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला अस पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मोठा भाऊ खाली पडल्याने लहान भाऊ रडत होता. हे पाहून त्यांची आई गॅलरीमध्ये आली त्यावेळी ही गंभीर घटना समोर आली. या घटनेमुळे गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 11:17 pm

Web Title: 12 year boy dead in pimpri nck 90
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड: चार महिन्यांच्या चिमुकलीच्या अपहरणाप्रकरणी महिलेला अटक
2 पुण्यात आढळले ७४३ नवे करोनाबाधित, तीन रुग्णांचा मृत्यू
3 कचरा व्यवस्थापनासाठी ‘स्वच्छ’लाच पाठिंबा
Just Now!
X