पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १६९ रुग्ण आढळल्याने १ लाख ६३ हजार ५७ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार ३३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ३९२ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५३ हजार ५३१ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९८ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, १६१ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८८ हजार ६७८ वर पोहचली असून पैकी, ८५ हजार ३७४ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ७९० एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.