पुणे शहरात आज दिवसभरात १७०५ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे आता पुण्यातली रुग्णसंख्या ३४ हजार ४० एवढी झाली आहे. आज करोनामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ९१७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर आज दिवसभरात ७७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत पुण्यातल्या २१ हजार १०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

दरम्यान मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली या ठिकाणी लॉकडाउनही वाढवण्यात आला आहे. आजच सोलापूर आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांमधलाही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, मास्क लावा. बाहेरुन घरात आल्यावर सॅनेटायझर वापरा, हातपाय धुवा करोनाला घाबरु नका पण काळजी घ्या हे आवाहन सातत्याने करण्यात येते आहे.