पुणे शहरात दिवसभरात २२२ नवे करोनाबाधित आढळले असून, सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ७७ हजार ५८० झाली आहे. तर ४ हजार ६०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ४१२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत १लाख ६८ हजार ६९२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९० नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, १६३ जण करोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९६ हजार ४३ वर पोहचली आहे. यापैकी ९२ हजार ६७५ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७६४ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इंग्लंडमधून प्रवास करून परतलेल्या पुण्यातील एका व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य आधिकाऱ्यानं दिली आहे. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर असून, त्याची करोनाच्या विषाणूची स्ट्रेन इंग्लंडमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंशी मिळती-जुळती आहे का? हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे सहायक मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.