जेजुरी,वार्ताहर
पुरंदर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४०९ एवढी झाली आहे तर तालुक्यात आज कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला एकूण मृतांची संख्या १९ झाली आहे . जेजुरीमधून ३६ स्वॅप तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यातील १० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत जेजुरीत ८ रुग्णाची भर पडली असून रुग्णांची संख्या ३० झाली आहे .निरा गावात १ रुग्ण नव्याने सापडला असून तेथे प्रथमच रुग्ण आढळला आहे .तालुक्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही करोनाने हातपाय पसरले आहेत.

सासवड ,जेजुरी या शहरी भागाबरोबरच सोनोरी , गराडे येथे रुग्णसंख्या जास्त आहे सासवड तहसील कार्यालयातील एक कर्मचारी,एक जेष्ठ डॉक्टर, व्यापारी आदींचे मृत्यू करोनामुळे झाल्याने चिंता वाढली आहे.प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत असून आतापर्यंत १७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सासवड व जेजुरी येथे कोविड सेंटर उघडण्यात अली असून या सेंटर मध्ये तालुक्यातील रुग्णावर उपचार केले जात आहेत. पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४०९ झाल्याचे सांगितले.