28 September 2020

News Flash

पुण्यात दिवसभरात ४५ करोनाबाधितांचा मृत्यू; नव्याने आढळले १,९७८ रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये ५० हजार रुग्णांनी केली करोनावर मात

पुणे शहरात दिवसभरात नव्याने १९७८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १,१९,६५७ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार ७९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या १,५८७ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ९९ हजार ०७६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ५० हजार रुग्णांची करोनावर मात

पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,६२२ वर पोहोचली आहे. यामध्ये समाधानकारक बाब म्हणजे आत्तापर्यंत ५०,०४१ जणांनी करोनावर मात केली असून हे सर्व जण ठणठणीत बरे झाले आहेत. आज शहरात १,०३८ करोनाबाधित रुग्ण आढळले असून ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १,६८२ रुग्ण आज करोनातून मुक्त झाले आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६,६१६ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 10:13 pm

Web Title: 45 corona victims died in pune in a day 1978 newly corona patients found aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 कुठे नेऊन ठेवलंय पुणं आमचं?; मोहन जोशी यांचा भाजपाला सवाल
2 पुणे जिल्ह्यातील घटना; व्हेंटिलेटर बेडअभावी करोना रुग्णांचा मृत्यू
3 धक्कादायक! ठार मारण्याची धमकी देऊन, अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Just Now!
X