पुणे शहरात आज दिवसभरात ८६१ नवे करोनाबाधित आढळले, तर १५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या २२  हजार ३८१ वर पोहचली आहे.

आज अखेर ७३० रुग्णांचा करोनामुळे शहरात मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ६३० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना आज घरी सोडण्यात आले. आज अखेर १३ हजार ७३९ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज सर्वाधिक ५८१ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांची संख्या ४ हजार ८६१ वर पोहचली आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे ३६३ जण आज करोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण २ हजार ९०६ जण  करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्रात ५ हजार ३६८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २०४ मृत्यूंची नोंद मागील चोवीस तासांमध्ये झाली आहे. आज आलेल्या संख्येनंतर महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या २ लाख ११ हजार ९८७ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ३ हजार ५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १५ हजार २६२ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ५४.३७ इतका झाला आहे.