पुणे शहरात आज दिवसभरात ९९२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर १३ जणांचा आज करोनामुळे मृत्यू झाला. याचबरोबर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४८ हजार ५७ वर पोहचली.

आज अखेर १ हजार १६६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार १७५ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर २८ हजार ५९३ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

देशभरासह राज्यात अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल ९ हजार ४३१ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर, २६७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ३ लाख ७५ हजार ७९९ वर पोहचली आहे.

राज्यभरातील एकूण ३ लाख ७५ हजार ७९९ करोनाबाधितांच्या संख्येत, सध्या उपचार सुरू असलेल्या १ लाख ४८ हजार ६०१ जणांचा  व आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या २ लाख १३ हजार २३८ जणांचा समावेश आहे. राज्यात करोनातून बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ५६.७४ टक्क्यांवर आले आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.