News Flash

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या १६ वर्षीय तरुणीची प्रियकराकडून हत्या

चारित्रावर संशय घेऊन केला खून; स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊ दिली गुन्ह्याची कबुली

संग्रहीत

पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या १६ वर्षीय तरुणीचा तिच्या २८ वर्षीय प्रियकराने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. चारित्रावरील संशयावरून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सागर वानखेडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर वानखेडे हा मूळचा बुलढाणा आणि मृत अल्पवयीन तरुणी ही मुंबईची आहे. या दोघांची एका प्रवासात ओळख झाली. काही काळाने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी मागील वर्षभरापासून पुणे शहर आणि पेरणे फाटा परिसरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले. आरोपी हा एका कंपनीत कामाला होता, तर संबंधीत तरुणी घरीच असायची, तिच्याजवळ मोबाईल होता. त्यामुळे ती सतत मोबाईलवर बोलत रहायची. यामुळे त्या दोघांमध्ये त्यावरून सतत भांडण होत असत. आज दुपारी देखील ती फोनवर बोलत असताना. त्या दोघांमध्ये पुन्हा कडाक्याची भांडण झाली. त्यामध्ये आरोपी सागरने नायलॉनच्या दोरीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी स्वतः लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 10:11 pm

Web Title: a 16 year old girl living in a live in relationship was murdered by her boyfriend msr 87 svk 88
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड : विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून करोना टेस्ट
2 पुणे: फेसबुकवरील मित्राच्या नादात महिलेने २५ बँकांच्या ६७ खात्यात ४ कोटी जमा केले; पोलीसही चक्रावले
3 पुण्यातील देवदूत! करोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत मोफत रिक्षा प्रवास; तरुणांचा कौतुकास्पद उपक्रम