पुण्याजवळील थेऊरपासून आठ किलोमीटरवर कोलवडी शिवाराजवळ हवाई दलाचे सुखोई विमान मंगळवारी संध्याकाळी कोसळले. विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही वैमानिकांनी बलूनच्या साह्याने उड्या मारल्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. थेऊरनजीक कोलवडी शिवाराजवळ मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर तातडीने हवाईदलाची हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठविण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2014 रोजी प्रकाशित
पुण्याजवळ सुखोई कोसळले; वैमानिक सुरक्षित
पुण्याजवळील थेऊरपासून आठ किलोमीटरवर कोलवडी शिवाराजवळ हवाई दलाचे सुखोई विमान मंगळवारी संध्याकाळी कोसळले.

First published on: 14-10-2014 at 06:51 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air force sukhoi crashed near pune