राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने राज्य सरकारकडून अनलॉक प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. तर, विविध जिल्ह्यांमध्ये करोना संसर्गाचे परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाकडून निर्बंध शिथिल केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुणे शहरात देखील १४ जूनपासून निर्बंध अधिक शिथिल केले गेले आहेत. याबाबत आज पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या स्वाक्षरीनिशी निर्बंधांच्या शिथिलीकरणाबाबत माहिती देण्यासाठी पत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार, आता पुणे शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.तर, उपाहारगृहे, मद्याालये रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मद्याविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. सोमवारपासून (१४ जून) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

याशिवाय, अभ्यासिका, ग्रंथालय आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहातील. सार्वजनिक वाचनालय सुरू राहतील.कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था हॉलच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के सुरू राहतील. मॉल ५० टक्के क्षमतेनुसार सुरू राहतील. मात्र सिनेमागृह, नाट्यगृह, संपूर्णत: बंद राहतील. याचबरोबर, व्यायमशाळा (जिम), सलून ब्युटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहतील. मात्र या ठिकाणाी एसी सुविधा वापरता येणार नाही.

मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहतील. तसेच, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट रात्री १० वाजपेर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. पार्सल सेवा, घरपोच सेवा रात्री ११ पर्यंत सुरू राहणार आहे.

सामाजिक, राजकीय, धार्मिक व मनोरंज कार्यक्रमांना ५० लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ वाजपेर्यंत परवानगी  –

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे (उद्याने), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ५ ते ९ व दुपारी ४ ते ७ वाजपेर्यंत सुरू राहतील. याशिवाय, सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना/ सेवा व्यतिरिक्त सर्व खासगी कार्यालये कामाचे दिवशी ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. सर्व आउटडोअर स्पोर्ट्स हे आठवड्यातीवल सर्व दिवस सुरू राहातील. तसेच, इनडोअर स्पोर्ट्स सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सुरू राहतील. सामाजिक, राजकीय, धार्मिक व मनोरंज कार्यक्रमांना ५० लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ वाजपेर्यंत परवानगी राहील. विवाह समारंभ हे हॉलच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील. अंत्यसंस्कार व दशक्रिया व त्याच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील. विविध बैठका, सभा, स्थानिक तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा या ५० टक्के उपस्थितीत घेण्यास परवानगी राही. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त ३ व्यक्ती यांना इतर प्रवाशांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करण्यास परवानगी राहील.

पुणेकरांना दिलासा पण…; मॉल्स उघडणार, दुकानं ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय

शहरातील करोना सद्या:स्थिती आणि उपाययोजनांबाबत शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. त्या वेळी संसर्गाचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यास शहरातील निर्बंध आणखी शिथिल के ले जातील, असे त्यांनी स्पष्ट के ले होते.